Ahamdanagar

कार आणि ट्रॅक्टरच्या अपघातात ट्रॅक्टरचा चुराडा

कार आणि ट्रॅक्टरच्या अपघातात ट्रॅक्टरचा चुराडा

सुनील नजन

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील नगर-शेवगाव रोड वरील ढवळेवाडी फाट्याजवळ हॉटेल राजयोग समोर कार आणि ट्रॅक्टरचा अपघात होऊन अपघातात ट्रॅक्टरचा पूर्णपणे चुराडा झाला.
याबाबतची माहिती अशी कि, नगर- शेवगाव रोड वर ढवळेवाडी फाटीजवळ हॉटेल राजयोग समोर झायलो गाडी क्र : एम एच ०४ जी डी ०२९८ ही गाडी शेवगाव कडे जात होती व उसाच्या वाड्याने भरलेला ट्रॅक्टर पैठणहून कौडगाव आठरे ता. पाथर्डी येथे चालला होता. झायलो गाडीने ट्रॅक्टरला जोराची धडक दिल्यामुळे ट्रॅक्टरचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. ट्रॅक्टर चे सर्व पार्टस रस्त्यावर इतरत्र विखुरलेले होते. ट्रॅक्टर चालक अपघातात जखमी होऊन त्याला उपचारासाठी अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान झायलो गाडीच्या अपघातानंतर गाडीतील सर्व प्रवासी चालकासह अंधाराचा फायदा पसार झाले.
झायलो गाडीतील कागदपत्रांच्या माहितीनुसार सदर गाडी हि निर्मल टूर्स अँड ट्रॅव्हल्स, औरंगाबाद यांच्या नावे नोंद असल्याची माहिती मिळाली. सदरच्या गाडीमध्ये मालाच्या पावत्यांवर भारती अँड कंपनी, होलसेल क्लॉथ मर्चंट, कडबी मंडी, जालना व नाथुमल वासुदेव, अर्जुन खोतकर बिसनेस सेंटर जूना मोंढा, जालना यांच्या नावाने पावत्या आढळून आल्या.
हा अपघात नववर्षाच्या पहिल्याच रात्री ८.३० च्या दरम्यान झाला. हा अपघात झाला तेंव्हा अतिशय जोराचा आवाज झाल्यामुळे रस्त्यालगत घरे असनारे शेतकरी सर्व रस्त्यावर जमा झाले. झायलो गाडीतील सर्व प्रवासी दारूच्या नशेत असल्याचे प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्यांनी सांगितले. सदर अपघातातील ट्रॅक्टर हा सोनालीका कंपनीचा असून ट्रॅक्टर क्र. एम एच १६ बी एम २६६४ हा मिनीनाथ लक्ष्मण आठरे रा. कौडगाव आठरे ता. पाथर्डी जी. अहमदनगर यांचा असल्याचे समजले. अपघातानंतर ट्रॅक्टरच्या चालकाला अहमदनगर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजले. या अपघातानंतर या अपघाताची पाथर्डी पोलीस स्टेशन ला कोणत्याही प्रकारची नोंद झाल्याचे आढळून आले नाही.

प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button