Amalner

Amalner: चोऱ्यांचे सत्र: विहिरीतील तांब्याची वायर चोरीस…

Amalner: चोऱ्यांचे सत्र: विहिरीतील तांब्याची वायर चोरीस…

अमळनेर अमळनेर तालुक्यातील अंतूर्ली परिसरातील पाच
शेतकऱ्यांच्या विहीरी वरील तांब्याची केबल वायर चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मारवड पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.

याबद्दल सविस्तर माहिती अशी की, अंतूर्ली येथील शेतकरी लोटन दौलत पाटील, हरीश आबा पाटील, भटू सुरेश पाटील व योगेश शिवाजी पाटील यांच्या विहिरीवरून, तसेच शंकर वसंत पाटील यांच्या बोअरवेल ते स्टार्टरपर्यंत टाकलेली तांब्याची केबल वायर दि 5 रोजी रात्री अज्ञात चोरट्याने कट करत चोरुन नेली आहे. एकूण 480 फूट लांबीची व 9990 रु किमतीची केबल चोरुन नेली. या संदर्भात मारवड पोलीसात लोटन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हे कॉ सुनील अगोणे हे करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button