Amalner: अमळनेरमध्ये ईद उत्साहात साजरी; दहा हजार मुस्लिम बांधवांचे सामुदायिक नमाज पठण
अमळनेर आज ईद-उल-फित्रचा मोठा सण मुस्लिम समाजाने मोठ्या उत्साहात, पारंपारिक पद्धतीने तसेच शांततेत साजरा केला. ईद-उल-फित्रचा मुख्य सोहळा ऐतिहासिक बोरी नदी जवळ ईदगाह मैदानावर आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास झाला. यावेळी शहर परिसरातील सुमारे दहा हजार मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण केले.
यावेळी जामा मस्जिद चे पेशईमाम नौशाद आलम यांनी नमाज पठन केले व दुआ अजहर नुरि यांनी देशासह अमळनेरच्या प्रगतीसाठी तसेच शांतता अबाधित राहण्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात केलि. प्रशासन तर्फे सोयीसुविधा देण्यात आली व पोलीसांमार्फत चोख बंदोबस पार पाडण्यात आला. मुस्लिम बांधवांना ईद मुबारकच्या शुभेच्छा देण्यासाठी ईदगाह मैदानावर आमदार अनिल पाटील, मा. आ. शिरीष चौधरी, मा. आ. बी.एस. पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी राकेश जाधव, निरीक्षक विजय शिंदे, उपनिरीक्षक परदेशी, न.प. मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रशांत सरोदे, नाना धनगर, महेंद्र महाजन, संतोष लोहरे, नरेंद्र संदानशिव, पंकज चौधरी, योगराज संदानशिव, मनोज पाटील, महेश पाटील, विठोबा महाजन, बबली पाठक, श्रीराम चौधरी, अबु महाजन, राजेश पाटील,भरत पवार, सुधीर चौधरी, योगेश पाटील, सुनिल शिंपीं, बाळु पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांचे ईदगाह कब्रिस्तान ट्रस्ट तर्फे शुभेच्छा व आभार व्यक्त करण्यात आला.






