Amalner

Amalner: अंबर्षी टेकडीवर ओपन जिम सामग्रीचे भव्य उद्घाटन …

Amalner: अंबर्षी टेकडीवर ओपन जिम सामग्रीचे भव्य उद्घाटन …

अमळनेर उद्या रविवार दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी, अंबर्षी टेकडीवर बावीस्कर परिवारातर्फे लावलेल्या ओपन जिम सामग्रीचे भव्य उद्घाटन करण्यात येणार आहे. २२ फुटी हनुमान मंदिराच्या परिसरात लावलेल्या या व्यायाम साधनांनी नागरिकांना विविध प्रकारांचे सर्वांगीण व्यायाम करण्याची अद्वितीय सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
यामुळे टेकडीवर फिरायला येणाऱ्या सर्वांवर, विशेषतः युवकांना व्यायामाच्या तयारीसाठी सकारात्मक परिणाम होणार आहे. विजय बावीस्कर आणि परिवाराने सुमारे ४ लाख रुपये खर्च करून ही अत्याधुनिक सामुग्री तयार केली आहे.

उद्घाटन समारंभ टेकडी परिवारातील ज्येष्ठ सदस्य यांच्या हस्ते होणार आहे. सर्वांनी रविवारी सकाळी ८.०० वाजता अंबर्षी टेकडीवर उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. अंबर्षी टेकडी वृक्ष संरक्षण गृपातर्फे करण्यात आले आहे.

तसेच, या विशेष दिवशी दुपारी १२ वाजता सिंधी कॉलनी युवा गृप तर्फे श्री २२ फुटी हनुमान मंदिरात “भंडारा” आयोजित करण्यात आला आहे. भाविकांनी यामध्ये सक्रिय सहभागी होण्यास सादर आमंत्रण दिले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button