Amalner

Amalner: भावासाठी धावली बहीण..! हेच खरे रक्षबंधन..!

Amalner: भावासाठी धावली बहीण..!

अमळनेर एकुलत्या एक भावासाठी बहीण यकृत दान करणार असली तरी त्यासाठी लागणारे 21 लाखाच्या खर्चासाठी तालुक्यातील करणखेडे येथील तरूणाई एकवटली असून त्यांनी सोशल मीडियावर ग्रुप बनवून आर्थिक मदत मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

अमळनेर तालुक्यातील करणखेडे येथील रहिवासी व सध्या पुणे येथे
रोजगारासाठी वास्तव्यास असलेल्या संतोष धोंडू पाटील यांचा मुलगा चि. राहुलचे (वय 17 वर्ष) यकृत निकामी झाले आहे. राहुलचे वडील संतोष धोंडू पाटील यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे. हातावरचे पोट, घरी स्वतःची शेतजमीन नसल्याने काही वर्षांपूर्वी ते रोजगारासाठी पुणे येथे स्थिरावले. ते तेथील खाजगी कंपनीत वाचमेनची नोकरीवकरू लागले. त्यांच्या पत्नी छायाताई धुणी-भांडी करून आपल्या संसाराला हातभार लावतात, त्यांना दोन अपत्य असून मोठी मुलगी नंदिनी सध्या पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहे व लहानगा राहूल दहावीच्या वर्गात आहे. परिस्थिती जेमतेम असली तरी आपल्या मुलांनी खूप शिकावे अशी दोघा पती-पत्नींची मोठी इच्छा होती. परंतु गतवर्षी राहुलची तब्येत अचानक
बिघडली. त्याला नवी मुंबईच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेण्यात आले. त्या ठिकाणी विविध तपासण्या केल्यानंतर राहुलचे यकृत निकामी झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. एकुलता मुलगा त्याच्यात शरीराचा महत्त्वाचा अवयव निकामी झाले.त्यांना डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला असून
राहुलची मोठी बहीण नंदिनी यकृत दान करण्यासाठी तयार असून डॉक्टरांनी प्रत्यारोपणाचा खर्च 21 लाख रुपये पर्यंत सांगितला आहे. यकृत प्रत्यारोपण तातडीने न केल्यास राहुलच्या जीवाला धोका होऊ शकतो, अशी सूचनाही डॉक्टरांनी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री सहायता फंड व मुख्यमंत्री सहायता निधी यासाठीही प्रस्ताव पाठवला असून त्यातून सहा लाख रुपये उभे राहणार आहेत. बाकीचे 15 लाख रुपये कसे उभे करायचे असा प्रश्न या दांपत्यापुढे उभा राहीला. याव्यतिरिक्त महिन्यासाठी राहुलच्या विविध तपासण्या आणि औषधीचा खर्च जवळपास सहा हजारापर्यंत येत असून हे कुटुंब मोठ्या आर्थिक विवंचनेत आहे. यासाठी गावातील तरुणांनी एकत्र येत सोशल मीडियावर देणाऱ्याने देत जावे हा ग्रुप स्थापन केला असून त्याद्वारे गाव व गाव परिसरातील ग्रामस्थांना व नोकरी कामी बाहेरगावी वास्तव्यास गेलेल्या चाकरमान्यांना राहुलच्या यकृत प्रत्यारोपणासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button