रजनीकांत पाटील
अमळनेर : तालुक्यातील डांगरी येथील सर्व कुटुंबाना ग्रामपंचायत तर्फे मास्क व डेटॉल साबणाचे वाटप करण्यात आले.
गावातील प्रत्येक कुटूंबाला 2 मास्क व 2 डेटॉल साबण असे घरपोच जाऊन वाटप करण्यात आले.अशा वेळी परिसरात नागरिकांनत समक्ष जनजागृती ही करण्यात आली गावातील सरपंच अनिल शीसोदे, उपसरपंच कमलाबाई शिसोदे, ग्रामसेवक वासुदेव मारवडकर, ग्रामपंचायत सदस्य, व कर्मचारी उदय शिसोदे,पोलीस पाटील पंजाबराव वडीले,पाणीपुरवठा कर्मचारी सुभाष पवार, संगणक परिचालक दिनेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच जांच्या कडे रेशनकार्ड नाही अशा ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.






