sawada

नविन पाणीपुरवठा योजनाद्वारे सुटणार सावदा वासियांची समस्या!

नविन पाणीपुरवठा योजनाद्वारे सुटणार सावदा वासियांची समस्या!

“तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांनी निवडून आल्यानंतर न.पा.हद्दीतील सुगंगानगर येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात नवीन जल कुंभ उभारण्याचे आश्वासन त्यांनी त्याप्रसंगी सुगंगानगर वासियांना स्वतः त्यांनी दिले होते.अशी चर्चा या अनुषंगाने नागरिकांमध्ये होत आहे.”
—————————————-
“नवीन पाणीपुरवठा योजना अंदाजीत २० कोटी रुपयांची असून यात मंगलवाडी ते सावदा फिल्टर प्लांट पर्यंत नविन स्वरूपाची पाईपलाईन टाकणे, संपूर्ण शहराची नवीन पाईपलाईन सह मंगलवाडी येथील नवीन जॅकवेल टाकणे,सावदा येथे कन्या शाळा भागात ४.५० लक्ष लिटलचे नवीन एक जलकुंभ उभारणे.अशी कामे होणार आहे.”
—————————————-

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

रावेर तालुक्यातील सावदा शहरात गावठाण बाहेरील रहिवासी परिसर अधिक प्रमाणात वाढल्याने तसेच सध्या सुरु असलेली पाणीपुरवठा योजना जुनाट झाल्यामुळे एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा देखील कमी दाबाचा होत असताना उन्हाळ्यात नागरिकांना पीण्याचे पाण्याची समस्या आणखीनच सोसावी लागत होती.तरी ही समस्या कायमची दुर व्हावी.अशी मागणी शहरातील करदात्यांची होती.या अनुषंगाने सन २०१९ मध्ये नव्याने सुधारित पाणीपुरवठा योजना करिता नगरसेवकांनी सर्वनुमते ठराव मंजूर करून प्रस्ताव शासन दरबारी पाठवले असता तांत्रिक मान्यता व डी.एस.आर रेट मध्ये बदल झाल्याने,दोष दुरूस्ती करिता हे प्रस्ताव दोनदा परत आले. तरी नवीन पाणीपुरवठा योजनेची ही प्रलंबित प्रक्रिया लवकर मार्गी लावण्याच्या दृष्टीने आमदार चंद्रकांत पाटील यांनी याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसोबत मीटिंग लावून सदर योजनेला तांत्रिक मंजुरी मिळवून दिली.यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित पाणीपुरवठा योजनेस लवकर नगर विकास मंत्रालय कळून प्रशासकीय मान्यता मिळणार असून शहरवासीयांच्या मागणीला अखेर यश येतील असे चित्र दिसून येते.तरी या योजनेबाबत आज दि.१/२/२०२३ रोजी माध्यमाचे प्रतिनिधी यांनी समक्ष भेटून चर्चा केली असता सदर काम मार्च अखेर पर्यंत मार्गी लागू शकते.तसेच सदरील काम पालिका मार्फत होणार की काय? याबाबत विचारले असता शक्यतो हे काम शासकीय स्तरावरून स्थानिक स्वराज्य संस्थांनाच दीले जावू शकते.असे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button