Amalner

आर के नगरला क्रांतिकारक भगतसिंग यांची जयंती साजरी

 आर के नगरला  क्रांतिकारक भगतसिंग यांची जयंती साजरी

आर के नगरला क्रांतिकारक भगतसिंग यांची जयंती साजरी

अमळनेर येथिल आर के नगरला  क्रांतिकारक भगतसिंग यांची जयंती प्रबोधनपर कार्यक्रमासह देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाने युवकांनी साजरी केली.
            शहीद भगतसिंग युवक मित्र मंडळातर्फे भगतसिंग जयंतीनिमित्त  यावेळी सामूहिक प्रतिमा पूजन करण्या
त आले.कार्यक्रम अध्यक्ष नगरसेवक श्याम पाटील यांनी “भगतसिंग यांच्या जीवनकार्याचा आदर्श युवकांनी घ्यावा ” असे आवाहन केले.सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी देशभक्त क्रांतिकारक भगतसिंग हे एक वाचक होते.त्यांनी सततच्या वाचनातून,चिंतन,मननाने केलेल्या लेखन कार्यातून क्रांतिकारकांच्या जीवनकार्याची माहिती पोहचवलतर स्वतःच्या बलिदानातून जनतेत स्वातंत्र्याची ओढ निर्माण केली असे सांगितले.नगरसेवक राजेश पाटील यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 
  
●देशभक्तीपर गीत गायन कार्यक्रम
        गायिका सौ.अपेक्षा पवार आणि गायक शाहरुख यांनी भगतसिंग जयंतीनिमित्त देशभक्तीपर गीते सादर करून माहोल तयार केला. यावेळी मंचावर जेष्ठ नागरिक शांताराम जिभाऊ पाटील, राजे प्रतिष्ठान चे अध्यक्ष अक्षय चव्हाण उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक धिरज पाटील यांनी केले.तर कु.निकिता देशमुख हिने सूत्रसंचालन केले.आभार शुभम शिंपी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वीर भगतसिंग मित्र मंडळचे धिरज पाटील, कल्पेश जगताप, अभिषेक पाटील , प्रणव पवार, आकाश आगलावे, महेश संदनशिव, अतुल भदाने,वेद पाटील,शुभम शिंपी,यांचे सह स्थानिक नागरिक चेतन पाटील,भूषण भदाणे,सुनिल वाणी,दिपक पवार,संजय शिंपी,शुभम पाटील आदिंनी सहकार्य केले. कार्यक्रमास आर के नगर परिसरातील महिला,नागरिक यांच्यासह तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button