शेतकरी उपाशी शासकीय कर्मचारी तुपाशी–—- अधिकाऱ्यांचे अप-डाऊन सुरूच….
शासनाने उपाययोजना करण्याची गरज….
ग्रामीण भागातील जनतेची कामे खोळंबली……
शासनावर घरभाडे भत्त्याचा भार..
चिमूर प्रतिनिधी — ज्ञानेश्वर जुमनाके
शंकरपूर…मागील वर्षी चे अजून पर्यत गारपीट नुकसा नि चे नुसकां भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नसून या वर्षी सुद्धा दोन दिवसा अगोदर चिमूर तालुक्या अवकाळी पावसाने हजेरी लावली गारपिट सुद्धा झाली असून शेतकरी हवाल दीर झाले आहेत एकी कडे सरकारने कर्ज माफी दिली पण अजून पर्यत काही शेतकऱ्यांना मिळाली नाही शेतकरी हा देशाचं पोशिंदा असून सुद्धा त्याच्या कडे शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करीत आहेत शासकीय कर्मचारीमुख्यालयही राहूनच आपले कर्तव्य बजावे असे शासनाचे आदेश असताना सुद्धा या आदेशाला केराची टोपली दाखवत विविध कार्यालयातील कर्मचारी,अधिकारी बाहेरगावावरून अपडाऊन करत आहेत. त्यामुळे शासनाने यावर कडक उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे..
चिमूर हे तालुक्याचे ठिकाण असून महत्वाचे ठिकाण आहे व जिल्ह्या होण्याच्या वाटेवर आहे या ठिकाणी कृषी विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, तहसील कार्यालय, दुयम निबंधक कार्यालये,विविध बँका, वीज वितरण कार्यालय, वन विभाग कार्यालय, बांधकाम विभाग तसेच इतर कार्यालये आहेत..
तालुका ठिकानावरून अधिकारी ग्रामीण भागात कृषी सहाय्यक, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, आदींची नियुक्ती कर्तव्य बजावन्याकरिता केली आहे परंतु तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयात व ग्रामीण भागात कर्तव्य बजावणारे अनेक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे आजही अपडाऊन करत असल्याने नागरिकांचे व शेतकऱ्यांचे कामकाज वेळेत होत नाही आहे तालुक्याच्या ठिकाणी बाहेरगावावरून येणारे सामान्य जनतेला, शेतकऱ्यांना अनेक वेळा अधिकारी नसल्याने खाली हात परत जावे लागत आहे शासनाने दिलेल्या 5 दिवस आठवड्याची आदेशाची अंमलबजावणी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करून सामान्य जनतेला शेतकऱ्यांना आश्रय द्यावा.
तसेच मागील हप्त्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या मिरची, गहू, चणा पिकांचे नुकसान झाले असून सुद्धा अजून पर्यंत शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान पंचनामे करण्यात आलेली नसल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये अधिकारी विरोधात रोष निर्माण झाले आहेत, बहुतांश अधिकारी व कर्मचारी हे वास्तव्याच्या ठिकाणी राहात नसल्याने अनेक कार्यालयाचे प्रमुख अधिकाऱ्यांना त्यांचे शासकीय निवासस्थान असल्यावर सुद्धा बाहेरगावावरून अपडाऊन करत आहे व घरभाडे घेऊन शासनाची दिशाभूल करत आहे असे करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकरी, नागरिकांकडून करण्यात येत आहे……






