Mumbai

जिल्हा परिषद शाळा बोळींज येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

जिल्हा परिषद शाळा बोळींज येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

राजेश सोनुने

दिनांक २६ जानेवारी २०२० रोजी जिल्हा परिषद शाळा बोळींज विरार तालुका वस‌ई जिल्हा पालघर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात भारताचा तिरंगा फडकविण्याचा मान वस‌ई विरार शहर महानगरपालिका चे प्रभाग समिती ‘ ए ‘ बोळींज चे सभापती श्री. सखाराम महाडीक साहेब यांना मिळाला या प्रसंगी बोळींज चे विद्यमान नगरसेवक अजित नाईक, माजी नगरसेवक नितीन मुळे, सिमा काळे मॅडम, माजी सरपंच मन्सुर शेख, नशाबंदी मडळं महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील व बोळींज गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या या वेळी शाळेतील विद्यार्थी नी देशभक्ती गीत व लेझिम पथके सादर केले तसेच श्री. भालचंद्र वझे लिखित व्यसनमुक्ती पथनाट्य विद्यार्थी नी सादर केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यसन विरोधी पथनाट्य स्पधे॔त शाळेने सहभाग घेतला होता व उत्तेजनर्थ बक्षिस मिळवले होते. यावेळी नशाबंदी मडळं महाराष्ट्र राज्य चे मुंबई संघटक दिशा कळंबे मॅडम यांनी व्यसनमुक्ती ची शपथ दिली तर व्यसनमुक्ती वर मार्गदर्शन नशाबंदी मडळं महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक मिलिंद रूपचंद पाटील यांनी केले व भारताचा ७१ वा प्रजासत्ताक दिन हा संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे अशा संदेश जिल्हा परिषद शाळा बोळींज चे शाळेच्या प्रमुख शिक्षिका सौ. मृणाली पाटील यांनी केले तर सोफिया रॉंडीग्ज यांनी पाहुण्यांचे आभार व विद्यार्थी चे कौतुक केले हा कार्यक्रम शाळेच्या पटांगणात आयोजित करण्यात आले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button