Amalner: चोऱ्यांचे सत्र : पाकीट मारण्यासाठी खिश्यात हाथ घातला पण..!
अमळनेर पाकीट मारण्यासाठी खिशात हात घालताच चोरटय़ाला पकडल्यानंतर
त्याने नखांनी ओरबाडत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला इतरांच्या मदतीने त्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची घटना अमळनेर येथील बस स्थानकावर घडली.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की दीपक सुरेश चिकाटे रा. चिकाटे गल्ली, न्यू प्लॉट अमळनेर हे काल दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास अमळनेर बस स्थानकावर त्यांच्या मामाना सोडण्यासाठी गेले असता बसच्या बाजूला उभे असताना कुणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पॅन्टच्या खिशात हात घालून पाकीट काढण्याचा प्रयत्न केला. याची चाहूल दीपक यांना लागल्याने त्यांनी चोरट्याचा हात पकडून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला.त्याच वेळी त्यांनी आरडाओरड देखील सुरू केली.म्हणून चोरट्याने त्यांना नखाने ओरबडून मारहाण सुरू केली. बस स्थानकावरील चहा व फुटाणे विक्रेते मदतीला धावून आल्याने त्यांच्या मदतीने चोरट्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
सैय्यद अरबाज सैय्यद यासिन असे आरोपीचे नाव असून तो नविन फॉरेन हॉस्पिटल च्यामागे, मालेगाव, जिल्हा नाशिक येथील रहिवासी आहे. आरोपीस अटक करून त्याच्यावर दीपक चिकाटे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.






