Nashik

के.व्ही.एन.नाईक महाविद्यालय दिंडोरी येथ निर्भय कन्या अभियान कार्यशाळा संपन्न

के.व्ही.एन.नाईक महाविद्यालय दिंडोरी येथ निर्भय कन्या अभियान कार्यशाळा संपन्न

सुनिल घुमरे नासिक विभागिय प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय दिंडोरी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच ‘निर्भय कन्या अभियान’ कार्यशाळा प्राचार्य डॉ.संजय सानप याच्या मार्गदर्शनाखाली ऑलाइन पार पडली. या कार्यशाळेसाठी डॉ. प्रतिभा जाधव यांनी ‘ विद्यार्थीनी व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर बोलताना विद्यार्थिनींनी विविध कलागुण आत्मसात केले पाहिजे असे मत व्यक्त केले.प्राचार्या डॉ. शाहीस्ता इनामदार यांनी ‘स्त्रियांसाठी समान संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले . यात त्यांनी स्त्री पुरूष समानता यावर भर दिला.तिसरे पुष्प प्रा.वैशाली गांगुर्डे यांनी ‘महिलांचे हक्क व अधिकार’ या विषयावर बोलताना कायदेविषयक सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमांचे अध्यक्ष व महाविद्यायाचे प्राचार्य डॉ.संजय सानप यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून मुलींनी सक्षम बनण्यासाठी उत्तम शिक्षण घेवून मानसिक व आर्थिक दृष्टिने स्वयंपूर्ण असणे आवश्यक आहे असे मत मांडले.प्रा. डॉ.प्रल्हाद दुधाने यांनी प्रास्ताविकपर मनोगतातून कार्यशाळेचा मुख्य हेतू आणि उद्देश स्पष्ट केला. .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक तुकाराम भवर यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.प्रल्हाद दुधाने यांनी केले.ऑनलाईन कार्यशाळेला प्राध्यापक , प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारीआणि विद्यार्थी मोठ्यासंख्यने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button