Maharashtra

बिरसा क्रांती दलाच्या जुन्नर तालुका अध्यक्ष पदी सुनिल विरणक, उपाध्यक्ष पदी बाळासाहेब लांघी यांची निवड

बिरसा क्रांती दलाच्या जुन्नर तालुका अध्यक्ष पदी सुनिल विरणक, उपाध्यक्ष पदी बाळासाहेब लांघी यांची निवड

पुणे प्रतिनीधी दिलीप आंबवणे

बिरसा क्रांती दल जुन्नर तालुका अध्यक्षपदी सुनील दुंदा विरणक, उपाध्यक्ष पदी बाळासाहेब बुधाजी लांघी, कार्याध्यक्षपदी दत्तात्रय गंगाराम गवारी, सचिवपदी मोहन गेणु लांडे, महासचिवपदी विश्वास सुदाम भालिंगे यांची निवड करण्यात आली आहे. बिरसा क्रांती दल ही संघटना महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात सामाजिक काम करत आहे आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम करत आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर या तालुक्यातील आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी व संघटनेच्या माध्यमातून तळागाळातील गोरगरीब जनतेची कामे करण्यासाठी जुन्नर तालुका कार्यकारणी निवड करण्यात आली आहे नियुक्तीचे पत्र बिरसा क्रांतीदल पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे यांनी त्यांना दिले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button