Maharashtra

शिरूड गावात दारू विक्रेत्यांनी केले कहर दारुड्यांची भरते हे जत्रा

शिरूड गावात दारू विक्रेत्यांनी केले कहर
दारुड्यांची भरते हे जत्रा

प्रतिनिधी रजनीकांत पाटील

अमळनेर : लॉक डाउन च्या अशा बिकट परिस्थितीत नागरिक आपला जीव मुठीत धरून घरात बसले आहेत.आरोग्या धोक्यापासून वाचाव म्हणून तोंडाला मास्क चा वापर करत अत्यावश्यक सेवे साठी च बाहेर पडत आहे. गरीब जनतेला अन्नधान्य मिळावं या साठी काही शासन उपायोजन करत आहे. काही सामाजिक कार्यकर्ते तरुण पिढी लोकांना अन्न घसरपोच मिळावं या साठी हेलपाट करत
आहे. अत्यावश्यक सेवाच शासनाने सुरू ठेवली आहे.अशा बिकट परिस्थितीत देखील काही लोक तर वेगळाच फायदा घेत खिसा भरत नागरिकांना व्यसनाधीन करत नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालवत आहे.
तालुक्यातील शिरूड परिसरात अध्यापही दारू बंद होण्याचे काही नावच नाही.
गावातील ग्रामपंचायत वारंवार सूचना देऊन तसेच सरपंच/ पोलीस पाटील यांनी देखील काही अज्ञात दारू पिणाऱ्यांना चोप दिला असता देखील त्यावर विक्रेते अथवा पिणाऱ्यांनवर कुठलाही प्रभाव न पडल्याचे दिसत आहे. गावातील दारू विक्रेत्यांनी तसेच दारू पिणाऱ्यांनी शासनाच्या लॉक डाउन चे लॉकच तोडले आहे. गावात दारू विक्री सुरूच आहे. यावर मात्र अध्यापही कुठलीही कार्यवाही नाही.
आता ही गावातील दारू विक्रेते /पिणारे यांनी गावाला एक प्रकारे कहरच केले आहे. रोज दारू पिऊन येणार तो कुणाचा तरी बाप,भाऊ,मुलगा संध्याकाळच्या वेळेस डोलत डालत घरात येतात मग ती घरात होणारी आरडा ओरड होणार धिंगाणा यात घरातील लहान मुलां बाळांन काय परिणाम होईल याचा देखील भान नसतो समोर वाढलेला जेवणाचा ताट त्यात जाणार तो दारुड्याचा हात या पासून त्याला तर सोडा संपूर्ण घरातील परिवाराला आरोग्यला धोकाच आहे. या बाबत मात्र महिलां वर्गाकडून नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने या कडे लक्ष देण्याची गरज आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button