Nashik

पत्रकार व त्यांचे कुटुंबियांना मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, नाशिक जिल्हा करणार पाठपुरावा

पत्रकार व त्यांचे कुटुंबियांना मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, नाशिक जिल्हा करणार पाठपुरावा

नाशिक : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, नाशिक जिल्हा कार्यकारिणीची नूकतीच शासकीय विश्रामगृह, नाशिक येथे संघाच्या पदाधिका-यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन या बैठकीत सर्व पदाधिकारी सुरक्षित व शारीरिक अंतर ठेवून, मास्क व सॅनिटाइजरचा वापर करून या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकार व त्यांचे कुटुंबियांना मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात, संघटनेच्या सभासदांना कुठल्याही प्रकारे वयाची अट न ठेवता लस उपलब्ध करून द्यावी, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सर्व पदाधिका-यांची शासन दरबारी नोंद व्हावी, पत्रकारावरील हल्ले थांबवावे तसेच हल्लेखोरांवर जलद गतीने कायदेशीर कारवाई व्हावी, पत्रकारांना टोल माफी व्हावी अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पाठपुरावा करणार आहे. यावेळी नवीन पदाधिका-यांची पद नियुक्ती करण्यात आली तसेच छावा मराठा संघटना जिल्हा अध्यक्ष मधुकर खोडे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नाशिक जिल्हा पदाधिका-यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने छावा मराठा संघटना जिल्हा अध्यक्ष मधुकर खोडे यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी संघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष नंदू पगार,पदाधिकारी साजीद शेख, बाबासाहेब गोसावी, जितेंद्र साठे, सोमनाथ क्षत्रिय, मनोहर भावनाथ, जाहिद शेख, दिनेश गोसावी, वैभव भांबर, मधुकर खोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकारांना मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, राज्य महिलाध्यक्षा डाॅ. सुधाताई कांबळे, राज्य क्राईम प्रमुख नफीस शेख, मंत्रालय व विधीमंडळ प्रमुख पंडित मोहिते पाटील, चित्रपट व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रशांत विलनकर, उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख नवनाथ गायकर राज्य, विभागीय, जिल्हा व सर्व तालुका पदाधिकारी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष नंदु पगार यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button