Amalner

Amalner: रेल्वे स्थानकात फूड स्टॉल ताबडतोब सुरू करावा…प्रीतपालसिंग बग्गा यांची मागणी..

Amalner: रेल्वे स्थानकात फूड स्टॉल ताबडतोब सुरू करावा…प्रीतपालसिंग बग्गा यांची मागणी..

अमळनेर येथील रेल्वे स्थानकावर उपलब्ध असणारे रेल्वेचे आरक्षित फॉर्म मराठी भाषेतून करण्यात यावे तसेच अमळनेर रेल्वे स्थानकावर बंद असलेले फूड स्टॉल सुरू करण्याची मागणी रेल्वेचे माजी झेड. आर.यु.सी.सी. मेंबर प्रीतपालसिंग बग्गा यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त अमळनेर स्टेशन मास्तर यांना लेखी निवेदन त्यांनी दिले आहे.

अमळनेर स्थानकावर वर्षानुवर्षेपासून रेल्वेचे आरक्षित फॉर्म इंग्रजी,गुजराथी आणि हिंदी आदी भाषांमध्ये उपलब्ध होत आहेत,प्रत्यक्षात सुरत भुसावळ मार्गावर नवापूर ते पाळधी स्टेशन दरम्यान मराठी भाषा वाचू व समजू शकणारे प्रवासी असून गुजराथी व इंग्रजी भाषा बरेच प्रवासी व कामगार वाचू व समजू शकत नाही.
यामुळे आरक्षित फॉर्म भरताना त्यांची मोठी अडचण होत असते, या महिन्यात आपण महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा केला असताना या दिवसाचे महत्व लक्षात घेता कामगार व प्रवाश्यांच्या सोयीसाठी मराठी भाषेत आरक्षित फॉर्म उपलब्ध करावेत अशी मागणी केली आहे.

अमळनेर स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर असलेले खाद्य पदार्थांचे स्टॉल नवीन टेंडर न निघाल्याने बंद असून प्रवाश्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.काही खायचे असल्यास किंवा पाणी हवे असल्यास मोठी अडचण होते,सद्यस्थितीत कडक उन्हाळा सुरू असल्याने अत्यंत आवश्यक असलेले पाणी उपलब्ध होत नाही.प्रत्यक्षात प्रवाश्यांना मोफत पाणी उपलब्ध करणे ही रेल्वेची जवाबदारी आहे. विकत देखील पाणी उपलब्ध होत नाही. तरी पिण्याच्या पाण्याची सोय करून बंद असलेले फुड स्टॉल लवकर सुरू करावे अशी मागणी बग्गा यांनी केली आहे.

अमळनेर रेल्वे स्थानकावर स्वच्छतेचे टेंडर न निघाल्याने स्वच्छता कार्य बंद असून स्वच्छता गृह सह इतर ठिकाणी मोठी घाण झाली आहे, या घाणीला प्रवाशी देखील वैतागले आहेत, तरी तातडीने टेंडर काढून रेल्वे स्थानकाची स्वच्छता नियमित केली जावी, याशिवाय टेंडर ला उशीर होत असल्यास नगरपालिकेचे सहकार्य घेऊन स्वच्छता करावी अशी मागणी प्रीतपालसिंग बग्गा यांनी केली आहे. सदर निवेदनाच्या प्रती रेल्वेचे डी आर एम, खासदार उन्मेष पाटील व सी एम आय अमळनेर यांना देण्यात आल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button