दिंडोरी तालुक्यातील पालखेड येथे दिंडोरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी अवैध दारू विक्री करताना संबंधितास पकडले
सुनिल घुमरे नाशिक
नाशिक : आज दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत पालखेड बंधारा येथे राहणारा इसम शशिकांत गजानन सोनवणे हा अवैधरित्या चोरट्या रीतीने देशी दारुची विक्री करत असल्याबाबत पोलीस निरीक्षक आनंद तारगे यांना बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी पीएसआय सचिन नवले कल्पेश कुमार चव्हाण .बैरागी पोलीस हवालदार दांडेकर पोलीस हवालदार एस के जाधव पोलीस शिपाई महेश कुमावत व महिला पोलीस शिपाई चव्हाण के यांनी पोलिस स्टाफ सह जाऊन खात्री केली असता सदर इसमाच्या ताब्यात पाच खाकी रंगाच्या बॉक्समध्ये 223 देशी दारूच्या बाटल्या मिळून आला असून 11,596/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळाला सदर इसमास व मुद्देमाल पोलिस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच सदर इसमावर Corona विषाणू संदर्भातही कलमान्वये गुन्हा दाखल याबाबत पुढील कारवाई दिंडोरी पोलीस करत आहे






