स्व.अंजली सूर्यवंशी यांच्या बाराव्या पुण्यस्मरणार्थ विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
प्रतिनिधी / सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल
दुसखेडा ता. यावल येथे *स्व.अंजली दिलीप सूर्यवंशी यांच्या बाराव्या पुण्यस्मरणार्थ एक छोटेखाणी कार्यक्रम स्व.अंजली दिलीप सूर्यवंशी फाउंडेशन यांच्या मार्फत आयोजित करण्यात आला.स्व. अंजलीताईच्या पावनस्मृतीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून मान्यवरांच्या हस्ते द्विप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संचालक ग.स.सोसायटी जळगाव योगेश भाऊ इंगळे हे होते. अंगणवाडीला मनोरंजन खेळणी व जि.प शाळेतील मुलांना थंड पाण्याची वाटर बॅग देण्यात आली त्या वेळेस लहान मुलांना खूपच आनंद झाला.से. नि. डी.वाय.एसपी किशोर सूर्यवंशी आणि से.नि.डी.वाय.एसपी दिलीप सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणातून अंजली ताईच्या सामाजिक कार्य सामाजिक बांधिलकी शैक्षणिक विकासा विषयी उजाडा दिला.योगेश भाऊ इंगळे यांनी स्व अंजली दिलीप सूर्यवंशी फाउंडेशनच्या माध्यमातून भव्य वाचनालय, सुसज्य जिम,आरोग्य विषयक प्रेरणादायी कार्य आज फाउंडेशन करत आहे.कार्यक्रमास यांची होती उपस्थिती प्रदिपभाऊ सोनवणे संचालक- प्रा.शिक्षकांची पतपेढी भुसावळ,दिव्यांग सेना जिल्हा सल्लागार राहुल कोल्हे,दिव्यांग सेना जिल्हा प्रशिद्धी प्रमुख विशाल दांडगे,सरपंच सौ.लक्ष्मीताई सोनवणे, ग्रा.प.सदस्या-चंद्रभागा दांडगे ,सुरेखा सोनवणे माजी पं.स.सदस्या. सौ प्रज्ञाताई सपकाळे, मायाताई सोनवणे, अंगणवाडी सेविका छायाबाई सोनवणे, मुक्ताबाई सोनवणे,अंगनवाडी मदतनीस मंगला पवार,सिंधुताई पाटील जि.प.शिक्षक प्रशांत पाटील, आरोग्य सेवक-सतीश पवार, ए.एन.एम.जाधव मॅडम, आशावर्कर-रेखाताई सोनवणे आरोग्य मदतनीस-लताताई सोनवणे,पराग वारके, योगेश जावळे, एम.एच.पाटील सर,विनोद सोनवणे,दिपक सूर्यवंशी,मंगेश झाल्टे,साजन लोंढे,समाधान सपकाळे,दीपक सोनवणे,भावेश सोनवणे,योगेश प्रजापती, जयेश पाटील,रोशन सोनवणे, शुभम सावळे,विकास सपकाळे, रविंद्र सपकाळे. कार्यकमाचे सूत्रसंचलन मुख्याध्यापक विनोद तायडे,सौरभ सोनवणे, आकाश पाटील कार्यक्रम यशस्वीते साठी विशाल दांडगे यांनी परिश्रम घेतले.आभार पराग वारके यांनी मानले.






