चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
चोपडा येथील प्रताप विद्यामंदिर शाळेतील सन 85 86 वर्षाच्या दहावीच्या ११० विद्यार्थी विद्यार्थिनींचा बचपन की यारी म्हणून ग्रुप आहे. कोल्हापूर येथील पूरग्रस्त लोकांसाठी राज्यभरातून विविध प्रकारची मदत प्राप्त होत आहे. आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून चोपडा बचपन की यारी ग्रुपने त्यांच्या गेट-टुगेदर कार्यक्रमासाठी जमवलेली रक्कम रुपये 25000/- त्यांच्या ग्रुपचे कोल्हापूर येथील सदस्य प्रा.अशोक लिमये व डॉ.मीना भुतडा(तिवडे) यांच्या माध्यमातून कोल्हापूर येथील पूरग्रस्त गरजु लोकांसाठी दिली.







