Bollywood

व्हायरल कट्टा..आणि मंदिरात गेली म्हणून सारा अली खान झाली ट्रोल..तू मुस्लिम आहेस..की हिंदू..

व्हायरल कट्टा..आणि मंदिरात गेली म्हणून सारा अली खान झाली ट्रोल..तू मुस्लिम आहेस..की हिंदू..

मुंबई बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही शाही घरण्यातून येते आणि तिला अभिनयाचा वारसा लाभला आहे. सारा सोशल मीडियावरबसतत सक्रिय असते. साराने सोशल मीडियावर मंदिरात गेल्याचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवरून तिला ट्रोल करण्यात येत आहे. तिला मुस्लीम असल्याची लाज वाटली पाहिजे असे काही टीकाकार म्हणाले .
सारा तिच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करण्यासाठी गुवाहाटीला गेलेली असून तयेथील लोकप्रिय आणि ५१ शक्तिपीठां पैकी एक कामाख्या देवीच्या दर्शनासाठी मंदिरात गेली. तिथले काही फोटो साराने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले. त्यानंतर सारावर सोशल मीडियावर धर्मावरून टिका करण्यात आली.
साराची आई अमृता सिंग शीख आणि वडील सैफ अली खान मुस्लीम असल्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी तिला मंदिरात गेली म्हणून ट्रोल केले आहे. एक जण म्हणाला ‘तू मुस्लीम आहेस की हिंदू?’ दुसरा म्हणाला, ‘मुस्लिमांच्या नावावर कलंक आहेस, भावासोबत २ पीसमध्ये पोज देणारी बेशरम मुलगी..जहन्नमी.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘तुला लाज वाटायली हवी, तू मुस्लिम आहेस.’ तर काही नेटकऱ्यांनी साराची स्तुती केली आहे.
दरम्यान, साराचा ‘कूली नंबर १’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होतो. तर, काही दिवसांपासून सारा ‘अतरंगी’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात सारासोबत अभिनेता अक्षय कुमार आणि दाक्षिणात्य अभिनेता धानूष मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button