जळगाव जिल्ह्यातील केरळ मधील एर्नाकुलम येथे रेल्वे अॅप्रेंटीस करिता गेलेल्या तरुणांची घरवापसीसाठीजिल्हाधिकाऱ्यांना विनंती पत्र
प्रतिनिधी मुबारक तडवी
१५ तरुणांची जळगाव जिल्हाधिकार्यांना पत्राद्वारे विनवणी
जळगाव जिल्ह्यातील यावल बोदवड भुसावळ रावेर व जळगाव या तालुक्यातील 15 तरुण विद्यार्थी केरळ राज्यातील एर्नाकुलम येथे साउथ रेल्वे अप्रेंटिस शिक्षणाकरिता दिनांक 13 एप्रिल 2019 ते 12 एप्रिल 2020 ह्या कालावधीपर्यंत केरळ राज्यामधील एरनाकुलम डिझेल लोको रोड वर्कशॉप आय डब्ल्यू सीएन डब्ल्यू याठिकाणी रेल्वे अप्रेंटिस करिता गेलेले आहेत
यात नितीन सपकाळे राहणार कासवे तालुका यावल अक्षय बोरणारे बोदवड ईश्वर कवडे राहणार कोल्हाडी तालुका बोदवड जहांगीर विनोद तडवी चुंचाळे तालुका यावल अविनाश भालेराव वरणगाव तालुका भुसावळ राहुल राहणार खेडा तालुका रावेर दिपक आनंदा वाघ मोठा वाघोदा तालुका रावेर गणेश सोनवणे दुसखेडा तालुका यावल वाघ मोठा वाघोदा तालुका रावेर सचिन सोनवणे तालुका यावल मयूर सपकाळ राहणार कंडारी भुसावळ विकास राजू भालेराव तालुका राहणार दुसखेडा तालुका रावेर दिपक तायडे राहणार शिरसोली तालुका जळगाव सिद्धार्थ तालुका भुसावळ यांचा समावेश आहे
मात्र जगात कोरोना या महाभयंकर आजाराने थैमान घातल्याने या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये व प्रसार होऊ नये याकरिता केंद्र सरकारने संचार बंदी कायदा लागू केल्याने सर्व शाळा विद्यालय महाविद्यालय तसेच आयटीआय प्रशिक्षण सर्वांना सुट्टी जाहीर केल्याने रेल्वे अप्रेंटिस प्रशिक्षणाकरिता गेलेल्या या विद्यार्थ्यांना प्रचलित समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांना पाठविलेल्या विनवणी पत्रात आम्हाला आपल्या जिल्ह्यात परत आणण्याची व्यवस्था करण्याचे विनंती वजा विनवणी पत्र पाठविले आहे तरी महासे जिल्हाधिकारी जळगाव सो तसेच संबंधित तालुक्यातील आमदार खासदार लोकप्रतिनिधी, सन्माननीय पालकमंत्री यांनी या पत्राची दखल घेऊन या विद्यार्थ्यांना जिल्ह्यात घर वापसी करिता (परत )आणण्यासाठी प्रयत्न करावेत व संबंधित राज्याशी तसा पत्रव्यवहार करावा अशी मागणीही या विद्यार्थ्यांतर्फे करण्यात आली आहे
RK News मुबारक तडवी रावेर






