Latur

लोककल्याण संस्थेकडून मोफत भरलेल्या पिकविमा पावत्यांचे वाटप…

लोककल्याण संस्थेकडून मोफत भरलेल्या पिकविमा पावत्यांचे वाटप…

लक्ष्मण कांबळे

कोराळ येथील लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांच्या मोफत पिकविमा फॉर्म भरलेल्या पावात्यांचे शेतकऱ्यांना वाटप.शेतकरी सध्या अनेक अडचणीचा सामना करत आहेत.अश्या शेतकर्यांच्या कठीण परिस्थितीत लोककल्याण संस्थेकडून मोफत पिकविमा फॉर्म भरून देऊन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विक्रम दासमे यांनी कोराळ गाव व परिसरातील गावांमध्ये नविन आदर्श ठेवत अविस्मरणीय उपक्रम राबविला आहे.

पावती वाटप करताना विक्रम दासमे यांनी सांगितले की आपण गावातील व परिसरातील १५५ शेतकऱ्यांना मोफत फॉर्म भरून देण्यात आले. ही संस्थेतर्फे मोफत योजना गेल्या वर्षी पासुन आपण राबवत आहोत व अशीच शेतकऱ्यांची समाजसेवा यापुढेही मोफत पिक विमा फॉर्म भरून देऊन करण्यात येईल असे सांगितले.
या पावती वाटप कार्यक्रमासाठी कोराळ शिवसेना नेते किरण दासमे, विद्यासागर सुरवसे,प्रकाश माणिकवार पाटील, संस्थेचे सहायक अविनाश राठोड,संस्थेचे सचिव रवि दासमे, श्यामसुंदर सुरवसे,अजय सुरवसे,तात्याराव सुरवसे, बालाजी शिंदे,संभाजी सुरवसे, कोराळ युवासेना नेते – संस्थेचे अध्यक्ष विक्रम अशोकराव दासमे, दत्तात्रय सुरवसे व इतर संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button