खेड,पुणे प्रतिनिधी
बुधवार , दि.१० जुलै २०१९ या दिवशी पर्यावरण मित्र संघटना,भारत या संपूर्ण भारत देशांत वृक्षारोपण व पर्यावरण संरक्षणाचे निस्वार्थ कार्य करणाऱ्या संस्थेचे राष्ट्रीय सचिव – मा.श्री.जनार्दन सोनवणे सर यांच्या मार्गदर्शना खाली, पर्यावरण मित्र संघटना,भारत व ग्रामपंचायत मरकळ,तालुका खेड,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने , पुणे जिल्हा विभागातील , मरकळ डोंगर परिसर या ठिकाणी जवळपास १६०० ते १७०० वेगवेगळ्या वृक्षाचे रोपण करण्यात आले.
मा.सोनवणे सर यांची या पूर्वी पर्यावरण मित्र संघटना,भारत या संस्थेच्या पुणे जिल्हा अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. सोनवणे सर यांच्या निस्वार्थ पर्यावरण व समाजकार्य याची दखल घेऊन संस्थेच्या नियुक्ती समिती अंतर्गत व संस्थेचे संस्थापक श्री.देवा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांची राष्ट्रीय सचिव या संस्थेच्या मुख्य पदावर शिफारस करण्यात आली.सोनवणे सर यांचे समाजसेवा क्षेत्रातील कार्य देखिल उल्लेखनीय असून महाराष्ट्र राज्य सोबतच संपूर्ण भारतात वृक्षारोपण तसेच पर्यावरण जनजागृती संदेश देत देशाला हरित करण्याचा मानस आहे.
सदर वृक्षारोपनास पर्यावरण मित्र संघटना,भारत संस्थेचे खेड तालुका युवा अध्यक्ष कुमार रामेश्वर बाविस्कर यांनी मोलाचे श्रमदान केले.तसेच ग्रामपंचायत मरकळ चे सदस्य बालाजी जंगाळे, गणेश लोखंडे , संतोष लोखंडे , सुरेश धगे , दत्ता दळवी , स्वप्निल सोनवणे आदि पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.








