Chalisgaon

पोलीस स्टेशन तर्फे मेहुणबारे हद्दीतील सुज्ञ नागरिक व तरुणांना आवाहन

पोलीस स्टेशन तर्फे मेहुणबारे हद्दीतील सुज्ञ नागरिक व तरुणांना आवाहन

-पोलीस स्टेशन मेहुणबारे हद्दीतील सुज्ञ नागरिक व तरुणांना आवाहन करण्यात येते की-

मनोज भोसले

दिनांक 24/ 10/19 रोजी विधानसभा निवडणूक मत मोजणी प्रक्रिया असून मतमोजणी निकालानंतर काही अतिउत्साही तरुण मिरवणूक काढणे, विरोधकांच्या घरासमोर घोषणा देणे, तसेच विरोधकांच्या घराजवळ फटाके वाजवणे ,गुलाल उधळणे असे कृत्य करून आपापसात राजकीय व जातीय तेढ वाढवतात त्यामुळे भांडण तक्रारी होऊन मारामारी सारखे गंभीर गुन्हे घडतात व त्याचे वाईट परिणाम गावातील लोकांना व नातेवाईकांना,तरुणांना भोगावे लागतात.

⏩ दिवाळी सणाच्या कालावधीमध्ये आशा प्रकारचे वाद होऊन तुरुंगामध्ये जाऊ नये म्हणून सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

⏩ ज्याच्यावर गुन्हे दाखल होतील त्यांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळणारे नाही व भविष्यात पासपोर्ट, खाजगी नोकरी , सरकारी नोकरी मध्ये चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आल्याशिवाय नोकरी मिळणार नाही तसेच उद्योगधंदे करिता लागणारे NOC मध्ये सदर गुन्हे समाविष्ट होऊन भविष्यात सर्व ठिकाणी अडचणी येणार आहेत

⏩ तसेच आचारसंहितेचे उल्लंघन करण्यामुळे विविध प्रकारच्या कायद्याखाली त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल होऊ शकतात.

⏩ त्यामुळे यापूर्वी गुन्हे दाखल असणाऱ्या इसमांना आणखी गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांच्यावर जिल्ह्यातून तडीपार तसेच प्रतिबंधात्मक कारवायांचा भविष्यात कारवाई होईल

? तरी सर्व तरुण मित्रांना व कार्यकर्ते, नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करण्यात येते की मतमोजणीचे दिवशी कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. कायदा व सुव्यवस्था राखून आपल्या गावात ,हद्दीत शांतता राखावी करिता आवाहन करणेत येते
*- सहा.पोलीस निरीक्षक मेहुणबारे पोलीस स्टेशन -*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button