Mumbai

आखाडा विधानसभेचा…आदित्य ठाकरे व सुजात आंबेडकर यांच्यात रंगणार समोरा समोर युद्ध ….

आखाडा विधानसभेचा….
आदित्य ठाकरे व सुजात आंबेडकर यांच्यात रंगणार समोरा समोर युद्ध …

आखाडा विधानसभेचा...आदित्य ठाकरे व सुजात आंबेडकर यांच्यात रंगणार समोरा समोर युद्ध ....

मुंबई प्रतिनिधी
मुख्यमंत्री पदासाठी शिवसेने कडून आदित्य ठाकरे यांचे प्रोजेक्ट केले जात आहे त्या पार्श्वभूमीवर बेलापूर किंवा वरळी विधानसभा फायनल होण्याची शक्यता असताना वंचित बहुजन आघाडी कडून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात सुजात आंबेडकर यांना उतरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
शिवसेने कडून जनअशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून आदित्य संवाद घडवूनआणला जात आहे.
शिवसेनेचा भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांना प्रोजेक्ट केल जात आहे त्यासाठी खास प्रशात किशोर यांची ईलेक्शन मॅनेजमेंट “आयपॅक” ही कंपनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदासाठी ब्रॅडींग सुरू केली आहे.
आता शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारालाच खो घालण्यासाठी वंचित कडून सुजात आंबेडकर यांना आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उतरवून तगडे आव्हान “वंचित” कडून देणार असल्याचे बोलले जात आहे.
वंचित बहुजन आघाडी कडून सुजात आंबेडकर यांचे मुबंईत दादर वरळी व बेलापूर मध्ये दौरे कार्यक्रम कार्यकर्ता मेळावा आयोजित केले जात आहे त्या पार्श्वभूमीवर शिवाजी मंदिर दादर शिवसेना भवना शेजारीच येथे “युगंधर” नावाने कार्यकर्ता मेळावा घेत शक्ती प्रदर्शन करून शिवसेनेवर व आदित्य ठाकरे यांच्या वर हल्ला बोल करत उभा राहण्याचे संकेत दिले आहेत.
तसेच न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुजात आंबेडकर यांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचे स्वप्न
पाहून मुख्यमंत्री बनता येत नाही असा टोला ही सुजात आंबेडकर यांनी आदित्य ठाकरे यांना यांना लगावला.
आगामी काळात आदित्य ठाकरे व सुजात आंबेडकर या दोन्ही युवा नेत्यां मध्ये सामाना रंगण्याची चिन्हं आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button