Pune

नायब तहसिलदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७ हजार रुपयांची लाच घेताना पकडला रंगेहाथ …..

 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नायब तहसीलदारला ७ हजार रुपयांची लाच घेताना पकडले रंगेहाथ …..

नायब तहसिलदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७ हजार रुपयांची लाच घेताना पकडला रंगेहाथ .....

पुणे प्रतिनिधी योगेश भोई: 
अपर तहसिलदार कार्यालय पिंपरी-चिंचवड येथील नायब तहसिलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदारांनी तहसिलदार कार्यालयात ऐपतदार दाखल्याची मागणी केली होती. या दाखल्यासाठी तेथील निवासी नायब तहसिलदार यांनी ७ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली असल्याची तक्रारदारांनी तक्रार नोंदवली होती. सदर तक्रारीची २५ सप्टेंबर २०१९ रोजी पडताळणी केली असता लोकसेवक विकी परदेशी, निवासी नायब तहसिलदार यांनी लाचेची मागणी केल्याचे आढळले. त्यावरून २५ सप्टेंबर रोजी विकी परदेशी याला वाकड येथील विंडवर्ड को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या आवारात लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर वाकड पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त/अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक दिलीप बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button