फैजपूर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा स्टॉप येथे दोन सिमेंट बाकडे नगरसेवक शेख कुर्बान यांच्यातर्फे देण्यात आले
सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल
फैजपूर : फैजपूर येथील गजबजलेल्या चौक परिसरात नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा स्टॉप असून येथे पाणपोईची व्यवस्था सुद्धा असल्यामुळे तसेच बऱ्हाणपूर अंकलेश्वर हायवे असून सुभाष चौक परिसर असल्यामुळे अनेक नागरिकांना येण्या जाण्यासाठी कुठेतरी थांबावे म्हणून अनेक अडचणी येत होत्या आणि सध्या वाढता उन्हाळाजाणवत असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना कुठेही थांबण्याची व्यवस्था नव्हती म्हणून आज दिनांक सहा मंगळवार रोजी रिक्षा स्टॉप च्या मागणीनुसार येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते नगरसेवक शेख कुर्बान यांनी तात्काळ अशी दखल घेऊन नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा स्टॉप जवळ दोन सिमेंटचे बाकडे यांची व्यवस्था करून दिली या नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा स्टॉप जवळ सध्या काही दिवसांपूर्वी झाडे लावले असून त्यामुळे बसविण्याची व्यवस्थासुद्धा असल्यामुळे या ठिकाणी शेख कुर्बान यांनी बाकड्यांची व्यवस्था केल्यामुळे येथील रिक्षा स्टॉप व नागरिकांची यामुळे थांबण्याची सोय झाली असून त्यामुळे नागरिकांच्या सध्यासमस्या दूर झाल्या असून या ठिकाणी बसण्याची व्यवस्था झाल्यामुळे रिक्षा स्टाफ ठिकाणी थांबण्याची व्यवस्था आधीपासून असल्यामुळे येथील परिसरातील नागरिकांना येथे पाणी पिऊन थोडं थांबावे असे वाटत होते या उद्घाटन प्रसंगी शेख कुर्बान बुरहान तडवी रिक्षाचालक असिफ व भुरा हे उपस्थित होते रिक्षाचालक व नागरिकांना बसण्याची व्यवस्था झाल्यामुळे रिक्षा स्टॉप आणि नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केला जात आहे






