Amalner

?️अमळनेर कट्टा…आणि प्रशासनास पडला माजी सैनिकाच्या परिवाराचा विसर..!अहो तहसीलदार साहेब उद्दघाटन समारंभ सोडून जरा देश भक्ती कडे वळा…!माजी सैनिकांच्या पत्नीच्या अंतिम संस्कारास प्रशासकीय अधिकारी अनुपस्थित.!

?️अमळनेर कट्टा…आणि प्रशासनास पडला माजी सैनिकाच्या परिवाराचा विसर..!अहो तहसीलदार साहेब उद्दघाटन समारंभ सोडून जरा देश भक्ती कडे वळा…!
माजी सैनिकांच्या पत्नीच्या अंतिम संस्कारास प्रशासकीय अधिकारी अनुपस्थित..!
अमळनेर येथील माजी सैनिक हैबतराव पाटील यांच्या पत्नी कै. इंदूबाई हैबतराव पाटील यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.कै हैबतराव पाटील हे अमळनेर तालुक्यातील माजी सैनिक होते.स्वातंत्र्य आंदोलनात पूज्य साने गुरुजी यांच्या समवेत कै हैबतराव पाटील यांनी भाग घेतला होता.अमळनेर येथे पूज्य साने गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली माळी वाडा येथील अमळनेर पोलीस चौकी जाळून निषेध व्यक्त करण्यात आला होता. या आंदोलनात कै हैबतराव पाटील हे साने गुरुजींच्या सोबत होते.1998 मध्ये हैबतराव पाटील यांचे देहावसान झाले.त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि 3 मुले होती.आज त्यांच्या पत्नी कै इंदूबाई पाटील यांचे निधन झाले असून शासकीय अधिकारी किंवा त्यांचा एक प्रतिनिधी अंतिम संस्कारासाठी उपस्थित राहणे आवश्यक होते. परंतु प्रशासनाने हा विषय गांभीर्याने न घेता ह्या अंतिम संस्कारा कडे पाठ फिरवली आहे.इतर उद्दघाटनाच्या कार्यक्रमांना कोव्हीड मध्ये देखील न चुकता उपस्थित राहणारे अमळनेर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना चमकोगिरी करण्याची सवय आहे. ह्या अंतिम संस्काराच्या ठिकाणी ना ही मिडिया येणार होता ना ही प्रसिद्धी मिळणार होती मग त्यांची उपस्थिती काय कामाची..!सर्व महत्वाची कामे सोडून कार्यक्रमांना उपस्थित राहणारे उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांनी आज शासकीय पायंडा मोडत एका माजी सैनिकाच्या कुटुंबाचा अपमान केला आहे.ही निषेध जनक बाब असुन ठोस प्रहार याचा जोरदार निषेध व्यक्त करत आहे. मोठ्या अभिमानाने 26 जाने 15 ऑगस्ट रोजी माजी सैनिकांच्या पत्नींचा सन्मान केला जातो मग ते फक्त दाखविण्यासाठीच असत का? खरा सन्मान किंवा आदर नाहीच या देशासाठी आपले जीव धोक्यात घालून स्वातंत्र्याची लढाई लढणाऱ्या या शूर वीरांची..!त्यांच्या बलिदानाने,त्याग,समर्पणाने स्वतंत्र झालेल्या या मातृभूमीला किती वेदना होत असतील ..!ह्याच साठी का सगळा अट्टाहास होता..!अरे मग ते विदेशी च बरे होते..कमीत कमी शूर विरांचा अभिमान होता त्यांना..!थरकाप उडत असे त्यांचा..!मातृभूमीसाठी बलिदान देणाऱ्या एक एक देशभक्ताच्या रक्ताने,घामाने पावन झालेली ही भूमी आणि संघर्षाने पेटवून ठेवलेली धगधगती देश भक्तीची मशाल विझू नये म्हणून च देश विरांचा सन्मान व्हावा,त्यांच्या बलिदानाच्या कथा ऐकून तरुणांच्या नसा नसात रक्त सळसळावे त्यांची आठवण राहावी यासाठी शाससाने काही नियम लागू केले आहेत. त्यात माजी सैनिक,किंवा त्यांची वीर पत्नीचा मृत्यू झाल्यास शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करणे आवश्यक आहे.
पण आज स्वार्थी प्रशासनास या गोष्टीचा विसर पडला की जाणून बुजून माजी सैनिकांच्या पत्नीच्या अंतिम संस्कारास प्रशासन उपस्थित राहू शकले नाही. यामागील कारण कळले नाही.दरम्यान सदर घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button