? कमळाबाई ने विकत घेतलेल्या मिडियाने केली जनतेची दिशाभूल…रोजगार,GDP,कोरोना इ विषयांना दिली तिलांजली..
प्रा जयश्री दाभाडे
सध्या संपूर्ण देशात गेल्या तीन महिन्यांपासून एकच विषय रवंथ केला जात आहे. तो म्हणजे सुशांतसिंग राजपूत ह्या अभिनेत्याची आत्महत्या…महत्वाच्या विषयांना बगल देत कंगना,रिया,ड्रग्स इ विषयांवर चर्चा केली जात आहे.
सध्या संपूर्ण देशात कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे.या अनुषंगाने अनेक नव्या आपत्ती निर्माण झाल्या आहेत. याकडे मात्र जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे.कमलाबाईने विकत घेतलेला मिडिया फक्त सुशांतसिंग राजपूत,कंगना रणावत,रिया चक्रवर्ती यांच्या संदर्भात च जोरात चर्चा करत आहेत.
गेल्या मार्च महिन्यात पासून देश आपत्ती व्यवस्थापन कसरतीतून जात आहे. या पार्श्वभूमीवर देशातील हजारो लोकांनी स्थलांतर केले या स्थलांतरात अनेक स्त्री,पुरुष,मुले,विद्यार्थी वेगवेगळ्या मार्गाने सफर झाले.अडचणीत आले.काही मृत्युमुखी पडले,काही अजूनही आपल्या गावी पोहचले नाहीत..शेकडो कुटुंबे आज उपाशी आहेत..रोजगार बुडाला आहे…हजारो कुटुंबांचे रोजगार बंद झाले आहेत परिणामी व्यापार,उद्योग धंदे बंद पडले असून देशाची अर्थव्यवस्था पूर्ण पणे कोसळली आहे.
गेल्या मार्च महिन्यापासून भारताचा GDP दर हा – 23% इतका घसरला असून याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. जागतिक पातळीवर भारताचा GDP दर हा सर्वात कमी असून जीडीपीचा दर देशाच्या आर्थिक प्रगतीचं प्रतीक असतं. सोप्या शब्दांत, जीडीपीचा दर वधारला असेल तर आर्थिक विकासाचा दर उंचावला असं म्हणता येतं. जीडीपीचा दर घटला असेल तर देशाची आर्थिक स्थिती खालावली असं म्हटलं जातं.जीडीपी दोन पद्धतींनी निश्चित केला जातो. कारण चलनवाढीसह उत्पादन खर्चात घट होते. हे प्रमाण ‘कॉन्स्ट्ंट प्राइज’ अर्थात कायमस्वरुपी दर आहे. यानुसार जीडीपीचा दर आणि उत्पादनाचं मूल्य एका वर्षासाठीच्या उत्पादनासाठी येणाऱ्या खर्चानुसार ठरतं.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन आणि अन लॉक च्या प्रकियेत GDP ची वाट लागली असून मन की बात मध्ये मात्र खेळण्यांची, कुत्रे पाळायची सूत्रे सांगितले जाते..जनतेचे लक्ष मूळ मुद्द्यावरून भरकटविण्यासाठी अनेक मिडीयाचा उपयोग करून वेगवेगळे फ़ंडे उपयोगात आणले जात आहेत.
चीनचा सीमेवरील घुसखोरी चा ज्वलंत प्रश्न देखील बिकावू मिडीयाला दिसतंच नाही…चिनी खेळांवर बंदी आणून ज्या पद्धतीने गेम खेळण्यात आला तो देखील काबिले तारीफ आहे…
कोरोनाच्या संदर्भात देशात अत्यन्त वाईट स्थिती आहे.वैद्यकीय क्षेत्रातील मनमानी कारभार, ग्रामीण,जिल्हा रुग्णालयांची दुर्दशा, रुग्णांचे हाल,या पार्श्वभूमीवर महिला आणि मुले यांच्यावरील परिणाम.. या कडे सोईस्कर पणे दुर्लक्ष केले जात आहे.
वरील विषयांवर कोणीही बोलायला तयार नाही.संपूर्ण मीडिया फक्त सुशांतसिंग राजपूतची आत्महत्या..पढवून पाठवलेली कंगना…रियाचे कनेक्शन… आणि आता या सर्वांच ड्रग्ज कनेक्शन…यातून पुढे येणारे नवीन बॉलिवूड कनेक्शन… राजकीय कनेक्शन… आणि बिहार इलेक्शन…हे सर्व घेऊन मिडिया अगदी हातात हात घालून मस्त पैकी जनतेला उल्लू बनवत आहे…मूळ मुद्दे विषय बाजूला ठेवून नको त्या विषयांवर फालतू निष्पन्न नसलेल्या चर्चा केल्या जात आहे.तरुण पिढीची दिशाभूल केली जात आहे.






