Nashik

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी धोरणाबाबत दिंडोरी तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी धोरणाबाबत दिंडोरी तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

सुनिल घुमरे नाशिक

दिंडोरी बुधवार,दि.१६.सप्टे.२०२० रोजी दिंडोरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारने तडका-फडकी बाजार भावांवर अंकुश ठेवण्यासाठीचे कारण पुढे करत कांदा निर्यातबंदी जाहीर केल्यानं शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान झाले आहे. संपूर्ण देशामध्ये कोरोनामुळे अर्थव्यवस्था डबघाईस आलेली असताना या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था व कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. केंद्र सरकारने सहा महिन्यात अशा प्रकारची कांदा निर्यात बंदी दोनदा लादल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. तसेच गेल्या पाच सहा महिन्यात कांद्याला बाजार भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्कील झाले असताना. त्यात ही निर्यातबंदी जाहीर करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांची कंबरडेच मोडले असल्याची भावना शेतकरी वर्गात आहे म्हणून ह्या धोरणाला विरोध करण्यासाठी दिंडोरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी तात्काळ न उठवल्यास तालुकाभर आंदोलन छेडण्याचा इशारा तालुकाध्यक्ष.सुनील आव्हाड काँग्रेस कार्याध्यक्ष.श्री.वाळू जगताप प्रांतीक सदस्य.प्रकाश पिंगळ शहराध्यक्ष.गुलाब जाधव, दिलीप शिंदे, पंडित गायकवाड, शांताराम खांदवे, नामदेव राऊत, कचरू गांगुर्डे, वसंत कावळे, सचिन आव्हाड व आदीसह तहसीलदार यांची भेट घेऊन असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button