Maharashtra

आगामी नियोजनाच्या अनुषंगाने वानखेडे स्टेडियमची महापौरांनी केली

आगामी नियोजनाच्या अनुषंगाने वानखेडे स्टेडियमची महापौरांनी केली पाहणी,एफ /उत्तर विभागातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा महापौरांनी घेतला आढावा
प्रभाग क्रमांक १९९ मधील आरोग्य शिबिराची महापौरांनी केली पाहणी

प्रतिनिधी पी व्ही आनंद

आगामी पावसाळ्याच्या दिवसात संसर्गजन्य आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, भविष्यातील नियोजनाच्या दृष्टिकोनातून जागेची उपलब्धता असावी या अनुषंगाने मुंबईच्या महापौर किशोरी किशोरी पेडणेकर यांनी आरोग्य समिती अध्यक्ष श्री. अमेय घोले यांच्यासमवेत आज दिनांक १६ मे २०२० रोजी वानखेडे स्टेडियमची पाहणी केली.
वानखेडे स्टेडियमच्या आतमध्ये आपत्कालीन परिस्थितीत कशाप्रकारे रचना करण्यात येईल याविषयी चर्चा करण्यात आली. तसेच स्टेडियमच्या आतमध्ये व बाहेर किती टॉयलेट व शौचालय असावे याची नियोजनात्मक चर्चा करण्यात आली. महापालिकेच्या “ए” विभागाच्या वतीने वानखेडेच्या प्रशासनाला एक पत्र देण्यात आले असून कोरोनाची सद्यस्थिती लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे महापौरांनी सांगितले.
याप्रसंगी ” ए” विभागाच्या सहाय्यक आयुक्त चंदा जाधव उपस्थित होत्या.
त्याचप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर या विविध विभागांना भेटी देत असून त्या अनुषंगाने एफ/ उत्तर विभाग कार्यालयाला महापौरांनी आज दिनांक १६ मे २०२० रोजी भेट देऊन विभागातील कोरोनाची सद्यस्थिती व रुग्णवाहिकांची अडचण जाणून घेतली. त्याअनुषंगाने योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधी सहाय्यक आयुक्तांना दिले.
याप्रसंगी विरोधी पक्षनेते श्री. रवी राजा, आरोग्य समिती अध्यक्ष श्री.अमेय घोले,एफ/ उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बेलाळे उपस्थित होते.
त्यानंतर महापौरांनी प्रभाग क्रमांक १९९ मध्ये जी /दक्षिण विभाग व वाडिया रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या प्राथमिक आरोग्य शिबिराला भेट दिली. यामध्ये सर्दी, ताप,खोकलाचे लक्षण असणाऱ्या रुग्णांची योग्य ती तपासणी करण्यासोबतच जेष्ठ नागरिकांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण ऑक्सीमीटरने तपासणीची सूचना महापौरांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे प्रभागातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन महापौरांनी शेवटी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button