सावदा येथे जागा मालक व महसूल विभागाची फसवणूक करून केले भव्य इमारतीचे बांधकाम..
सावदा : शासनाच्या वाळूबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून भव्यदिव्य इमारत मंजूर नकाशानुसार नसून, बांधकामासाठी वाळू रेती येते कशी,? यासंदर्भात चौकशीची तक्रार केल्याने, जागा मालकाला समजले आपल्या जमिनीवर अतिक्रमण करून बांधकाम सुरू आहे. तेव्हा जागा मालकाने चौकशी केली असता महसूल विभागाची फसवणूक करून, भव्य दिव्य बांधकाम सुरू असल्याचे उघड झाले.
येथील सामाजिक कार्यकर्ते युसूफ शाह यांनी मौजे सावदा येथे गट क्रमांक १२०९ प्लाट क्रमांक ६,७,८,९,१०,चे जागेवर बेकायदेशीर बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी रेती वाळूबंदीच्या संदर्भात दिनांक १५ जून रोजी प्रांताधिकारी अभिजीत थोरबोले यांच्या कडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल करून, येथील अवैधरित्या होत असलेले बांधकाम पाडण्याची तसेच वाळू बंदी असताना वाळू आली कशी यांची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी केली होती. प्रांताधिकारी यांनी दखल घेत येथील मंडळ अधिकारी पवार यांच्या कडे तक्रार देऊन चौकशी करण्याचे आदेश दिले. यावरून पवार यांनी जागा मालकाला बेकायदेशीर बांधकामासंदर्भात नोटीस बजावली असता जागा मालकाला समजले की, आपल्या जमिनीवर अतिक्रमण करून बांधकाम सुरू आहे. जागामालकाने लगेच x उत्तर दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, गट नंबर १२०९ मधील प्लाट नंबर ६,७,८,९,१० ही मिळकत माझ्या नावाने आहे. या जागेवर मी आजवर कोणत्याही बांधकामाच्या संदर्भात प्रस्ताव सादर केला नाही किंवा कोणत्याही सक्षम अधिकारी कडून परवानगी घेतलेली नाही. संस्था व माझ्या नावाचे जागेवर परस्पर किंवा परवानगी न घेता बांधकाम केले नसल्याने, नोटीस अनुसरून आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीच्या काही पदाधिकारी व संचालक मंडळाने मला विश्वासात न घेता परस्पर वगैरे केले आहे. तसेच येथील बांधण्यासाठी रेती वाळू वगैरेशी माझा काही संबंध नसल्याचे जागा मालकाने दिनांक ८ आँक्टोबर २०२० रोजी मंडळ अधिकारी यांना समक्ष, लेखी स्वरूपात दाखल केले आहेत.
यावरून सहज लक्षात येते की. इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी व काही संचालकांनी या जागेवर मला काही एक न विचारता मनमानीपणे माझी व महसूल विभागाची फसवणूक करून परस्पर खोटे कागदपत्रे सादर केल्याचे जागा मालक सलीम खान अब्दुल रज्जाक खान यांनी म्हटले आहे.
वरील सर्वप्रकार व माहिती महसूल विभागाच्या समोर आली असून सुद्धा, येथील बांधकाम न थांबविता किंवा न पाडता किंवा कारवाई न करता उलट येथील बांधकामावर दुमजलीचे बांधकाम जलद गतीने सुरू आहे. हे सर्व प्रकार कोणाच्या आशिर्वादाने सुरू आहेत असा प्रश्न शहरवासियांना पडला आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे व दखल घेऊन कारवाई करावी अशी अपेक्षा शहरातून व्यक्त केली जात आहे.






