Maharashtra

सर्वोदय माध्यमिक विद्यालय, सायगांव येथे युवानेते मंगेश चव्हाण यांचा सत्कार

सर्वोदय माध्यमिक विद्यालय, सायगांव येथे युवानेते मंगेश चव्हाण यांचा सत्कार

सर्वोदय माध्यमिक विद्यालय, सायगांव येथे युवानेते मंगेश चव्हाण यांचा सत्कार

चाळीसगांव प्रतिनिधी नितीन माळे
गिरणा नदीवर डौलदार व बागायती गाव म्हणून सायगांव चा परिचय सर्वांनाच आहे. सायगांवची जत्राही खूप प्रसिद्ध आहे. यासोबतच सायगाव गावाची शान म्हणजे तीन वेळा महाराष्ट्र केसरी झालेले श्री.विजय चौधरी.
सर्वोदय माध्यमिक विद्यालयाच्या सायगांव शाखेला युवा नेते मंगेश चव्हाण यांनी सदिच्छा भेट देत शाळेचे उपक्रम जाणून घेतले. त्यांनतर शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेच्या प्रगतीसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी जे काही करता येईल ते करण्याची ग्वाही युवानेते मंगेश चव्हाण यांनी दिली.
या सत्कारा प्रसंगी स.शि.प्र.को. चे सचिव प्रकाश पाटील, माजी पं.स.सदस्य सतिष पाटे, माजी पं.स.सदस्य संभाजी पाटील, शालेय समिती चेअरमन तात्यासो सुरेशराव सोनवणे, संचालक दादासो अर्जुन माळी, संचालक येवले, संचालक आनंदा पाटील,नगरसेवक भास्कर पाटील, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, मुख्याध्यापक नानासो तुकाराम बोरसे, मनोज गोसावी, सागर पाटील, सिद्धार्थ रजपूत, रणजित पाटील, उपशिक्षक संजय देवरे, शंकर मोरे, रवींद्र राजपूत, अनिल पाटील, मांगो यशोद, संदिप पाटील, श्यामकांत पाटील, मंगलसिंग कच्छवा, राहुल वाणी, कपिल महाले, सचिन पगार, दिपेश वासने, सिद्धार्थ जगताप, प्रमोद शिरसाठ, यांची उपस्थिती होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button