Amalner

कन्हेरे जि. प.शाळेत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

कन्हेरे जि. प.शाळेत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

कन्हेरे जि. प.शाळेत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न
             
अमळनेर  जि.प.प्राथमिक शाळा कन्हेरे ता. अमळनेर येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पडला याप्रसंगी पाडळसरे धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, वर्णेश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष दादासो. सुभाष चौधरी तसेच पाडळसरे धरण संघर्ष समितीचे सदस्य रामराव पवार आणि सुनिल पवार तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

कन्हेरे जि. प.शाळेत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न
             कन्हेरे जि. प.शाळेत आयोजित विविध स्पर्धा तसेच उपक्रमात प्राविण्य मिळविणाऱ्या गुणी विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने विविध बक्षिसांचे वितरण करण्यात आले. गावातील शिक्षणप्रेमी नागरिक संजय पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दकोश देऊन त्यांचा गौरव केला. यापवेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले. त्याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच पाडळसरे धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष दादासो सुभाष चौधरी यांनी शाळेस ११०१रुपयाचे तर पाडळसरे धरण समितीचे सदस्य श्री रामराव पवार यांनी १०१ रुपयाचे बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
             याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.बी.एस.शिरसाठ सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षक श्री.विनोद पाटील सर यांनी  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री.सुनील मोरे सर यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button