Bollywood: बापरे..! राज आणि नर्गिस यांची अभिनेत्री डिंपल कपाडिया अनौरस मुलगी..!
मुंबईः भारतीय चित्रपटसृष्टीत शोमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले राज कपूर हे खर्या अर्थाने शोमॅनहोते. राज कपूर यांच्या निधनानंतर कृष्णा राज कपूर या कपूर घराण्याच्या आधारस्तंभ होत्या. पण त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. 1946 मध्ये राज कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर कृष्णा यांना नव-याचे विवाहबाह्य संबंध बघावे लागले होते. नर्सिग आणि वैजयंती माला यांच्यासोबतचे राज कपूर यांचे अफेअर चांगलेच गाजले होते. पण या कठीण काळात कृष्णा कपूर डगमगल्या नाहीत. त्यांनी राज कपूर यांची साथ कधीच सोडली नाही. नर्गिस आणि वैजयंती माला यांच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर राज पत्नी कृष्णाकडेच परतले होते. राज कपूर आणि नर्सिग यांचे अफेअर सुरु असताना एक वेगळीच अफवा उठली होती. ती म्हणजे पाच मुलांचे वडील असलेल्या राज कपूर यांची डिंपल कपाडिया अनौरस संतान असल्याची चर्चा रंगली होती. नर्गिस आणि राज कपूर यांची डिंपल कपाडिया अनौरस संतान असल्याचे म्हटले गेले होते.
ते प्रकरण नेमके होते तरी काय, जाणून घेऊयात…
डिंपल ही नर्गिस यांची अनौरस संतान असल्याची चर्चा होण्याचे होते हे कारण…
– 1973 मध्ये राज कपूर दिग्दर्शित ‘बॉबी’ हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटातून राज कपूर यांनी त्यांचा धाकटा मुलगा ऋषी कपूरला फिल्म इंडस्ट्रीत हीरो म्हणून लाँच केले होते. तेव्हा मीडियात गॉसिप सुरु झाले होते की, डिंपल ही नर्गिस आणि राज कपूर यांची मुलगी आहे. त्यामुळे तिला ‘बॉबी’मध्ये लीड रोल देण्यात आला. याचे आणखी एक कारण म्हणजे डिंपलचा लूक नर्गिसच्या फिल्मी लूकशी बराच साधर्म्य साधणारा होता. पण लवकरच या सर्व अफवांना पूर्ण विराम लागला.
नर्गिस यांनी स्वतः दिले होते स्पष्टीकरण…
याप्रकरणी नर्गिस यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले होते. त्या एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या, “या अफवा कशा उठल्या याविषयी मला ठाऊक नाही. मी फक्त एवढेच म्हणेण, की ही घाणेरड्या वृत्तीच्या लोकांचा कारनामा आहे. राज कपूर यांच्या ‘बॉबी’तील डिंपलचा लूक माझ्या ‘आवारा’तील लूकशी साधर्म्य साधणारा आहे, त्यामुळे या कथा रचण्यात आल्या. अशा अफवा पसरवणे अतिशय मुर्खपणा आहे. देव न करो, पण जर कधी असे घडले असते, तर मी माझ्या मुलीला स्वीकारले असते. डिंपल अतिशय समजूतदार मुलगी आहे. तिने या अफवा गमतीवर घेतल्या आणि त्याकडे दुर्लक्ष केले. माझ्या कुटुंबीयांविषयी बोलायचे झाल्यास, माझ्या पती आणि मुलांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. अशा गॉसिप्समुळे तणावात येऊन मला मरायचे नाही.”
राज कपूर होते नर्गिस यांचे पहिले प्रेम…
बॉलिवूडचे पहिले शोमॅन राज कपूर यांच्यासोबत नर्गिस सिरीअस रिलेशनशिपमध्ये होत्या. दोघे फक्त रिलच नव्हे तर रिअल लाइफमधील रोमँटिक कपल होते. नर्गिस आणि राज कपूर यांच्या जोडीने एकुण 16 चित्रपट एकत्र केले, त्यापैकी सहा चित्रपट हे आर.के.बॅनरचे होते. ‘आग’, ’बरसात’, ’अंदाज’, ’आवारा’, ’आह’, ’श्री 420’, ’जागते रहो’ आणि ‘चोरी-चोरी’ हे या जोडीचे अविस्मरणीय चित्रपट आहेत. नर्गिस 19 वर्षांच्या असताना राज कपूर यांच्या प्रेमात पडल्या होत्या. पण त्यावेळी राज कपूर विवाहित होते. ते पत्नी कृष्णा कपूर आणि मुलांना सोडून नर्गिस यांच्यासोबत लग्न करु शकत नव्हते. कालांतराने नर्गिस आणि राज कपूर विभक्त झाले आणि नर्गिस यांनी सुनील दत्तसोबत लग्न केले.
लेखक यासेर उस्मान यांनी संजय दत्तच्या अनऑफिशियल बायोपिक ‘द क्रेजी अनटोल्ड स्टोरी ऑफ बॉलिवुड्स बॅड ब्वॉय संजय दत्त’ यामध्ये या घटनेचा उल्लेख आहे.







Most stupid writer,Nursing,,instead of Nargis…and..stupid qote Nargis married with Sanjay Dutt…He was her son, she married wi th Sunil Dutt..Sack him
Not Sanjay dutt, she married to Sunil Dutt….sanjay dutt is son!
Sanjay Dutt is her son, Nargis married Sunil Dutt