Bollywood: दृष्यम 3 बद्दल मोठी अपडेट.. विजय साळगावकर कमिंग बॅक…अजय देवगण सोबत भिडणार हा दाक्षिणात्य अभिनेता..
सुपरस्टार मोहनलाल आणि दिग्दर्शक जीतू जोसेफ यांनी 2013 मध्ये ‘दृश्यम’ हा क्राइम-थ्रिलर चित्रपट बनला. या चित्रपटाने केवळ साउथच नव्हे तर बॉलिवूडमध्येही आपली छाप सोडली. हा चित्रपट मल्याळममध्ये इतका हिट झाला की त्याचा हिंदीमध्ये अजय देवगण, तामिळमध्ये कमल हासन आणि तेलगूमध्ये वेंकटेश यांनी रिमेक केला.बॉलिवूडमध्ये दृश्यमला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं होतं.
सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांनी देशभरात धमाकेदार कमाई केली होती. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला आणि दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं.
त्यानंतर ‘दृश्यम 3’ बद्दलही अपडेट समोर आले आहे. मोहनलाल आणि जीतू जोसेफ यांनी ‘दृश्यम 3’ची तयारी सुरू केली आहे.मीडिया रिपोर्ट्समध्ये ‘दृश्यम 3’ चित्रपटाच्या शूटिंग आणि रिलीजबद्दल माहिती देण्यात आली आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे या चित्रपटाविषयी दक्षिण आणि बॉलिवूड दोन्ही ठिकाणी अपडेट्स देण्यात आले आहेत.
‘दृश्यम’च्या हिंदी आणि मल्याळम दोन्ही टीम्स चित्रपटाचा तिसरा भाग एकाच वेळी शूट करून भारतात एकाच तारखेला प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत.
अहवालानुसार, यावेळी मोहनलालच्या मल्याळम पार्टच्या रिलीजची प्रतीक्षा केली जाणार नाही. मल्याळम पार्ट रिलीज झाल्यामुळे ही कथा हिंदी प्रेक्षकांसाठी नवीन राहत नाही असं कारण यामागे सांगण्यात आले आहे.
मल्याळमच्या ‘दृश्यम 3’ मध्ये मोहनलाल जॉर्ज कुट्टीच्या भूमिकेत दिसणार आहे . त्याचवेळी, अजय देवगण हिंदीच्या ‘दृश्यम 3’ मध्ये विजय साळगावकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. वृत्तानुसार, चित्रपटाचे शूटिंग 2024 मध्ये सुरू होईल आणि त्याच दिवशी मल्याळम आणि हिंदी आवृत्ती प्रदर्शित होईल.






