Maharashtra

निंभोरा येथे योद्या महिलांचा स्टोल ,मास्क देऊन केला गौरव

निंभोरा येथे योद्या महिलांचा स्टोल ,मास्क देऊन केला गौरव

प्रतिनिधी संदीप कोळी

निंभोरा बु।। ता रावेर(वार्ताहर)निंभोरा आरोग्य केंद्राच्या महिला डॉक्टर ,महिला आरोग्य केंद्राच्या सेवीका, महिला कर्मचारी ,आशा गट प्रवर्तक ,आशा वर्कर, अंगनवाडी सेविका ,मदतनिस ,महिला पोलिस या सतत गावात योद्या म्हणून कार्य करीत आल्याने त्यांचा विशेष गौरव शिवभारत गॅस एजन्सी व नामदेव ढाके अॅण्ड सन्स तर्फे कापड़ी स्टोल, मास्क, साबण देऊन सौ.भानुप्रिया वैभव ढाके ,सौ. निता नरेंद्र ढाके, यांच्याहस्ते देऊन गौरव करण्यात आला यावेळी सरपंच डिगंबर चौधरी ,डॉ. सुधाकर चौधरी,राजीव बोरसे, आरोग्य केंद्राचे के एस महाजन यांनी योद्या महिलांचा सन्मान केल्याबद्दल समाधान व्यक्त करून योद्या महिलांचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे त्यांना जनतेने सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले .यावेळी डिस्टन्स ठेऊन वैभव ढाके, डेविन ढाके, गौरव ढाके, माधुरी बऱ्हाटे ,आशिष बोरसे, सुनील कोंडे, त्याच बरोबर निंभोरा केन्द्राचे डॉक्टर ,आरोग्य सेवक ,सेविका, आशा गट प्रवर्तक ,आशा वर्कर, अंगनवाडी सेविका ,मदतनिस ,महिला पोलिस यासह आदि उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button