? Crime Diary..तलाठ्याला मारहाण..वाळू माफियांची वाढती मुजोरी..एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
रजनीकांत पाटील
जळगांव काल मध्यरात्री अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तलाठ्याची कॉलर पकडुन धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. या संदर्भात
एमआयडीसी पोलिस स्टेशनला सरकारी कामात
अडथळा आणल्याप्रकरणी भा.द.वि. 353, 323 व 332 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगांव येथे वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी अवैध वाळू वाहतुक रोखण्यासाठी तहसीलदारांनी विविध
पथकांची नियुक्ती केली आहे. म्हसावद येथील तलाठी रामदास नेरकर, शिरसोलीचे तलाठी भरत नन्नवरे, जळके येथील राहुल अहिरे, अनिरुद्ध खेतमाळीस व नितीन ब्याळे तालाठ्यांचा या पथकात समावेश आहे.
आज मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील वावडदा चौफुलीवर नं नसलेले ट्रॅक्टर वाळू वाहतूक करत असताना या पथकाने पकडले.
ट्रॅक्टर चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न
केला. मात्र काही अंतरावर ट्रॅक्टर पुन्हा पकडण्यात आले असता चालक सागर चव्हाण याने तलाठी राहुल अहिरे यांची कॉलर पकडून धक्काबुक्की करत वाद घातला आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केला तसेच सरकारी कर्मचारी स धक्का बुक्की केली प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उप निरिक्षक विशाल सोनवणे करत आहेत.






