Palghar

जय आदिवासी युवा शक्ति (जयस) महाराष्ट्र यांच्या कडून मा. मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री यांना मयत पोलीस नाईक सखाराम भोये यांना न्याय मिळावा या संदर्भात ईमेल द्वारे निवेदन

जय आदिवासी युवा शक्ति (जयस) महाराष्ट्र यांच्या कडून मा. मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री यांना मयत पोलीस नाईक सखाराम भोये यांना न्याय मिळावा या संदर्भात ईमेल द्वारे निवेदन

राहुल साळुंके पालघर

पालघर : तुलिंज पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांच्या कडून वेळोवेळी पोलीस नाईक सखाराम भोये यांना अपमानास्पद वागणूक ,मानसिक त्रास,जातीवाचक शिवीगाळ या सर्व जाचाला कंटाळून पोलीस नाईक सखाराम भोये यांनी दि 24 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8:30च्या दरम्यान पी आय सूर्यवंशी यांच्या दालनात स्वतःच्या डोक्यात पिस्तुल ने डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली या संदर्भात मीरा भाईंदर चे पोलीस आयुक्त श्री सदानंद दाते साहेब यांना या घटनेला जबाबदार असलेले व आत्महत्येस प्रवृत्त करणारे पी आय जयकुमार सूर्यवंशी यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा,रॅगिंग ऍक्ट नुसार गुन्हा व अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करून मयत भोये व त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा या संदर्भात महाराष्ट्र जयस चे ईमेल द्वारे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन.

Leave a Reply

Back to top button