Rawer

महसूल विभागामार्फत प्रांताधिकारी फैजपूर व रावेर तहसीलदार यांच्या हस्ते आदिवासी तांड्यावर जिवनावश्यक वस्तू चे वाटप….

महसूल विभागामार्फत डॉ अजित थोरबोले प्रांताधिकारी फैजपूर व रावेर तहसीलदार सौ उषा राणी देवगुणे यांच्या हस्ते आदिवासी तांड्यावर जिवनावश्यक वस्तू चे वाटप….

ता..रावेर विलास ताठे रावेर तालुका प्रतिनिधी

खिरोदा मंडळात गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
सावखेडा ता रावेर-खिरोदा मंडळातील खिरोडा प्र यावल, सावखेडा बुद्रुक ,सावखेडा खुर्द, कुंभारखेडा, गौरखेडा, या गावातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने त्यांनी दिलेले धान्य व रोख रक्कम यांच्यासह ह्धान्याचे एकूण ८० किट तयार करून जुनीमोहमांडली सारख्या आदिवासी गरीब कुटुंबांना वाटण्यात आले. आज दिनांक १९ रोजी मंडळातील गरजू लाभार्थ्यांना कोरोना पार्श्वभूमीवर संचार बंदीच्या काळात ८० संसारोपयोगी किराणा सामानाचे कीट तयार करून वाटण्यात आले. या किटमध्ये तेल, साखर ,गहू, तांदूळ, तिखट ,मीठ अशा विविध दहा ते बारा वस्तूंचा समावेश आहे. जेणेकरून या गरीब कुटुंबांना थोडा आधार होईल.

याप्रसंगी खिरोदा मंडळतील खिरोदा प्र यावल, सावखेडा बुद्रुक, सावखेडा खुर्द कुंभारखेडा, गौरखेडा या गावातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने त्यांनी दिलेले धान्य व रोख स्वरुपातील पैसे तसेच मंडळ अधिकारी खिरोदा प्र यावल संदीप जैस्वाल, प्रमोद नायदे तलाठी खिरोदा, अजय महाजन तलाठी सावखेडा, उमेश बाभूळकर तलाठी चिनावल, हेमांगी वाघ तलाठी उटखेडा, खुरशद तडवी तलाठी लोहारा, श्रीहरी कांबळे तलाठी कोचूर व शांताराम कोतवाल, फिरोज कोतवाल यांच्या मदतीने आज मंडळातील गरजू लाभार्थ्यांना कोरोना १९ चे संकटामुळे निर्माण झालेले लॉक डाऊन मुळे एकूण ८० किट वाटप करण्यात आले. सदर किट वाटप प्रसंगी मा प्रांत अजित थोरबोले फैजपूर, मा उषाराणी देवगुणे तहसीलदार रावेर, गटविकास अधिकारी रावेर, व मंडळतील वरील कर्मचारी हजर होते.

फोटो खिरोदा मंडळात आदिवासी गरीब कुटुंबांना संसारोपयोगी वस्तूंचे वाटप प्रसंगी मा.प्रांत अजित थोरबोले ,उषाराणी देवगुणे तहसीलदार रावेर, संदीप जैस्वाल मंडळ अधिकारी खिरोदा, व समस्त तलाठी व लाभार्थी दिसत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button