Maharashtra

कोरोना संकटाच्या या काळात आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये महापालिका आयुक्त एक महिन्याच्या बाळासह कामावर रुजू

कोरोना संकटाच्या या काळात आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये महापालिका आयुक्त एक महिन्याच्या बाळासह कामावर रुजू

प्रतिनिधी प्रशांत नेटके

विशाखापट्टणमच्या महापालिका आयुक्त सृजना यांनी एक महिन्यापूर्वी मुलाला जन्म दिला होता. परंतु याचदरम्यान कोरोनामुळे टाळेबंदी लागू करण्यात आली. या काळात विशाखापट्टणम सारख्या महानगरात आयुक्ताची अत्यंत अधिक गरज भासत होती. सृजना यांनी जबाबदारी ओळखून कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मुलाला पती तसेच आईकडे सोडून दररोज त्या कामावर हजर होत आहेत. आयुक्त स्वच्छतेच्या कामकाजाची देखरेख करत आहेत.

*योगदान आवश्यक*

नवजात बालकाला आईची गरज असते, परंतु मी वैयक्तिक गोष्टींना बाजूला ठेवले आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा आदेश आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आम्ही कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्नशील आहोत. महामारी रोखण्यासाठी माझेही योगदान असावे, याकरता स्वच्छतेसह लोकांना शुद्ध पेयजल उपलब्ध करण्याचा प्रयत्न असल्याचे सृजना यांनी म्हटले आहे.

दरम्यान आता विशाखापट्टणमच्या पालिका आयुक्त जी. सृजना यांची सेवा ही अधिकच लक्षवेधी आणि प्रेरणादायी ठरत आहे. त्यामुळे त्याला आपल्या कुशीत घेऊन ही महिला आयुक्त सध्या निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. त्यामुळे त्यांच्या या कामावर काैतुकाचा वर्षाव केला जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button