Amalner

शिरूड शासनाच्या नियमांचे उल्लंघन गावात नागरिक जुमानत नसल्याने सरपंच,पोलीस पाटील यांची धावपळ

शिरूड शासनाच्या नियमांचे उल्लंघन गावात नागरिक जुमानत नसल्याने सरपंच,पोलीस पाटील यांची धावपळ

रजनीकांत पाटील

अमळनेर जगभरात कोरोनाचा विषाणूचे आहाकार माजवला असता तो आता आपल्या अमळनेर तालुक्यात येऊन ठेपला आहे या बाबत देखील सावधगिरी न बाळगता ग्रामीण भागातील नागरीक काहींना काही बहाणा घेत घरा बाहेर पडत आहेत. या बाबत ची खबरदारी घेता तालुक्यातील शिरूड परिसरात सरपंच व पोलीस पाटील यांनी गावातील नागरिकांची खबरदारी साठी गावात दिवसभर फिरत नागरिकांना वारंवार सांगावे लागत की कोणीही बाहेर पडू नये ही बाब नागरिक अजीबात जुमानत नसल्याने गल्लो गल्ली घोळके घालवून कुठल्याही प्रकारे सोशल डिस्टन्स व तोंडाला मास नसल्याने उभी असतात.

या बाबत गावातील सरपंच व पोलीस पाटील धाव पळ करत घोळके मोडत असतात. पुन्हा तेच चित्र या बाबत नागरिक कुठलीही सुरक्षा ना घेत गावाच्या चावडी वर येऊन गप्पा झोडतात दिवसा, सकाळी तसेच संध्याकाळी एक प्रकारे जत्रे चे स्वरूप प्राप्त होत असल्याचे दिसते. गाव परिसरात मोठा असल्याने वेळो वेळी धाव घेण्यात जास्त त्रास होत आहे तसेच पोलीस प्रशासनाची गाडी आली असता पळ काढतात गाडी परत गेली असता गर्दीचा माहोल होतो.चर्चा करत उभे राहतात तसेच कोणी वरिष्ठ आवर्जून सांगीतले असता अपशब्द प्रतिउत्तर देत असतात. या मुळे गावात शासनाच्या नियनाचे कुठल्याही प्रकारे पालन होत नसल्याचे दिसत आहे. या बाबत पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button