वीज तारांचा स्पर्श झाल्याने दोन बैलांचा मृत्यू
जळगाव येथील एकरुखी येथे पोलीस पाटील रवींद्र देवराम पाटील यांच्या बैलजोडीला शेतात वीज तारांचा शॉक लागल्याने दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने रवींद्र पाटील यांचा मुलगा अमोल बचावला मात्र सर्जा राजाची जोडी गेल्याने रवींद्र पाटील यांनी हंबरडा फोडला होता. मुलाचा जीव वाचला म्हणून समाधान माना असे गावकऱ्यांनी समजावल्यानंतर रवींद्र पाटील शांत झाले. १७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान ही घटना घडली.






