Amalner

Amalner: मारवड येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या…

Amalner: मारवड येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या…

अमळनेर तालुक्यातील मारवड या गावात जुन्या निंबाच्या झाडाला दोर बांधून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

याबद्दल सविस्तर माहिती अशी की, प्रशांत दिलीप साळुंखे (वय ४१) हा व्यक्ती ने सायंकाळी बस स्थानक परिसरात मित्रांसोबत सहजपणे गप्पा मारल्या आणि थोड्या वेळाने एकटाच जुन्या पोलीस वसाहती कडे निघून गेला. काही वेळा नंतर तो तेथील निंबाच्या झाडाला दोर बांधून गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसला. गावकऱ्यांनी प्रशांतचे शरीर खाली उतरवून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

याबाबत डॉक्टर विलास वसंतराव पाटील यांनी दिलेल्या खबरीवरुन मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी एपीआय जयेश खलाने, पीएसआय विनोद पाटील, हवालदार फिरोज बागवान, पोलीस नाईक सुनील तेली यांनी पंचनामा केला.
प्रशांत साळुंखेच्या पश्चात आई वडील, पत्नी, दोन मुली, भाऊ व काका असा परिवार आहे मृत प्रशांत हा १०८ वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम पाहत होता.पुढील तपास पो कॉ मुकेश साळुंखे करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button