Amalner: डॉ जयेश शिंदे व डॉ प्रतिज्ञा शिंदे यांनी महिलेला दिले जीवदान..
अमळनेर येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. जयेश शिंदे यांच्या दवाखान्यात पोटदुखीच्या असह्य वेदनेने अमळनेर तालुक्यातील नगाव येथील संगीताबाई पंढरीनाथ वारुळे या दि 23 रोजी दाखल झाल्या. महिलेला तपासून काही चाचण्या केल्या नंतर महिलेची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉ जयेश शिंदे यांनी घेतला. शस्त्रक्रिये दरम्यान महिलेच्या पोटातून 3 किलो 700 ग्राम वजनाची 19×15 सेंटीमीटर व्यासाची गाठ काढून या महिलेचा जीव वाचविण्यात डॉ जयेश व डॉ प्रतिज्ञा शिंदे यांना यश मिळाले.
आकाराने बराच मोठा असलेला हा फायब्रीब (fibrib) या प्रकाराचा हा गोळा काढून जीवदान देणाऱ्या सुखाजनी हॉस्पिटलच्या तज्ज्ञांचे रोहिदास पंढरीनाथ वारुळे व कुटुंबातील सदस्यांनी आभार मानले असून अत्यन्त अवघड अशी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ जयेश शिंदे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.






