Maharashtra

पंढरपूर भाजपा युवा मोर्चा ने बेवारस जनावरांना केले चारा वाटप

पंढरपूर भाजपा युवा मोर्चा ने बेवारस जनावरांना केले चारा वाटप

प्रतिनिधी रफिक आतार

पंढरपूर शहरांमधील लॉकडाऊनमुळे सर्वजण घरात आहेत. शासन व अनेक सेवाभावी संस्था गरजू भुकेल्या लोकांना मदत करत आहेत.
पण आपणही गरजू व भुकेले आहोत हे सांगूही शकत नाहीत अशा अनेक गायी, गाढवे इत्यादी मुके प्राणी गल्ली बोळात फिरत आहेत.रस्ते रिकामे असल्याने या मुक्या प्राण्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.ही जनावरे एका ठिकाणी थांबत नाहीत. अन्न पाण्यासाठी सगळीकडे भटकत असतात. त्यांचा शोध घेऊन त्यांच्या चारा व पाण्याची सोय भाजपा युवा मोर्चाने केली.
यावेळी पंढरपूर भाजपा युवा मोर्चा चे अध्यक्ष विदुल अधटराव भाजपा ओबीसी अध्यक्ष लखन ननवरे भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष आनंद (दादा) घोडके. भाजपा प्रसिद्धीप्रमुख प्रशांत (बाबा) धुमाळ .विजय दहिवडे. शुभम भोसले. अविनाश जक्कल. सतीश सासवडकर. अक्षय सासवडकर आदी परिश्रम घेत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button