लातुरात पत्रकाराला मारहाण करून खोट्या गुन्ह्यात आडकवण्याची दिली धमकी
प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे
लॉकडाऊनमुळं सर्वसामान्यांचं जीवन कठीण झालंय. त्यात पत्रकारांचाही समावेश आहे. लातूरमधील पत्रकार किशोर सोपान सोनकांबळे यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी गंजगोलाई येथील बाजारपेठेत एका मेडिकल स्टोअर्स समोर मास्क विकायला सुरूवात केली होती. त्याचवेळी संजयहिबारे नावाच्या पोलीस शिपायानं त्यांना इथं मास्क विकता येणार नाही म्हणून अरेरावी व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाणही केली. त्यामुळं जगायचं कसं, या विवंचनेतून सोनकांबळे यांनी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे इच्छामरणाची मागणी केलीय. सोनकांबळे यांनी जिल्हाधिका-यांच्या मोबाईलवर व्हॉटस्एप मेसेज पाठवलाय
दि.२६ मे रोजी सोनकांबळे कुटुंबाने घरी तयार केलेले मास्क अगदी कमी दराने गंजगोलाई येथे सायंकाळच्या सुमारास विक्री करत असताना संजय हिबारे नामक पोलीस कर्मचारी हे सोनकांबळे यांच्या जवळ आले व तुला येथे थांबण्यास कोणी परवानगी दिली, असे म्हणत मला एक हजार रुपये दे, नाही तर तुला खोट्या गुन्ह्यात आत पाठवतो असे म्हणून धमकावले त्या नंतर मी जीवन जगण्यासाठी हे करत असल्याचे सांगितल्यास मला मारहाण केली असे जर खरे कष्ट करणाऱ्या सोबत होत असेल तर जीवन जगण्या पेक्षा मरण बरे म्हणून मला मरण्याची परवानगी देण्यात यावी. अन्यथा हिबारे या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी विनंती सोनकांबळे यांनी जिल्हाधिका-यांना पाठवलेल्या मेसेजमध्ये करण्यात आली आहे.
लातुरात पोलीस पत्रकाराला मारहाण का ?करतात

पत्रकाराला जसे मारतात तसेच जर अवैध धंदे व मटके वाल्याना अवैध दारू विक्री करणाऱ्याला मारल्याचे आमच्या ऐकण्यात आलेले नाही इमानदारीने काम करणाऱ्याला लातूर चे पोलीस मारतात हे पत्रकार किशोर सोनकांबळे यांच्या प्रकरणावरून लक्षात येत आहे






