वूमेनेशन संमेलनासाठी रेखा चौधरी आमंत्रित
मुंबई प्रतिनिधी
भारतीय उद्योग परिसंघाने (द सीआयआय) नुकतेच सीआयआय आयडब्ल्यूएन चे चौथे वूमेनेशन संम्मेलन आयोजित केले होते. #BeyondBoundaries नामक शीर्षकाच्या ह्या संमेलनात अनेक विचारवंत नेत्यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. या प्रतिष्ठित परिषदेला ग्लोबल वेलनेस अॅम्बेसेडर ऑफ इंडिया आणि वनलाईन वेलनेसच्या मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून यशस्वी महिला उद्योजिका डॉ. रेखा चौधरी यांना वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. सिमेपार नावाजल्या जाणाऱ्या त्यांच्या ह्या भूमिकेने त्यांना बरीच प्रसिद्धी प्राप्त करून दिली आहे आणि त्यांची ही कहाणी जगभरातील महिलांना स्वावलंबी आणि स्वतंत्र होण्यासाठी प्रेरित करते.
त्या म्हणतात की, “एवढ्या मोठ्या, यशस्वी आणि प्रतिष्ठित व्यासपीठावर बोलणे हा मोठा सन्मान आहे. तेथील उपस्थिती प्रतिनिधी माझ्या कथेने प्रभावित आणि प्रेरित होतात ह्यासारखा दुसरा आनंद नाही.”
सीआयआयच्या प्रवक्ता म्हणाले, ““आम्हाला सहभागींकडून उत्साहवर्धक अभिप्राय मिळाला आहे, जे विषय आणि चर्चेची गुणवत्ता पाहून आनंदित होते.”
अश्या ह्या रेखा चौधरी ह्या उत्तरो उत्तर आणखी प्रगती करो आणि असेच इतर महिलांना प्रेरणा देत.






