Mumbai

?ब्रेकिंग : PMC बँक गैरव्यवहार प्रकरण; विवा ग्रुपच्या कोट्यवधीच्या मालमत्तेवर टाच

?ब्रेकिंग : PMC बँक गैरव्यवहार प्रकरण; विवा ग्रुपच्या कोट्यवधीच्या मालमत्तेवर टाच

मुंबईः पंजाब अँड महाराष्ट्र कॉ-ऑपरेटिव्ह(पीएमसी) बँक गैरव्यवहाराप्रकरणी सक्त वसुली संचलयनायाने( ईडी) विवा ग्रुपशी संबंधित 34 कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. यापूर्वी विवा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक मेहूल ठाकूर आणि कंपनीचे सल्लागार मदन गोपाळ चतुर्वेदी यांना ईडीने याप्रकरणी अटक केली होती. तसेच पाच ठिकाणी शोध मोहिमही राबवली होती.
विवा ग्रुपच्या मे. विवा होल्डींगशी संबंधित या मालमत्ता असून त्याची एकूण किंमत 34 कोटी 36 लाख रुपये असल्याचे अधिका-याने सांगितले. विवा ग्रुपचे हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने उद्धव ठाकरे सरकारला पाठींबा दिला आहे. बहुजन विकास आघाडीचे सध्या तीन आमदार आहेत.
गुरूआशिष कन्स्ट्रक्शनचे प्रवीण राऊत यांनी केलेल्या कथित मनी लाँडरिंगबद्दल दोन्ही आरोपींना पूर्ण माहिती होती. यावेळी राबवण्यात आलेल्या दोन शोध मोहिमेत 73 लाख रोख, डिजिटल आणि कागदोपत्र पुरावे जप्त करण्यात आले होते.
याप्रकरणी अंधेरी, जुहू आणि चेंबूरसह पाच ठिकाणी ईडीने शोध मोहिम राबवली. प्राथमिक तपासात पीएमसी बँक गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी एचडीआयएलचे वाधवान यांनी दोन मालमत्ता 34 कोटी रुपयांना विवा ग्रुपला दिल्या होत्या. त्यासाठी 2017 ला अॅग्रीमेंट करण्यात आले होते. हा व्यवहार 37 धनादेशांच्या मार्फत झाल्याचे दाखवण्यात आले होते. पण हे धनादेश वठवण्यात आले नसल्याचा ईडीला संशय आहे. पीएमसी बँकेतील 4355 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एचडीआयएलचे राकेश वाधवान, सारंग वाधवान, वारियम सिंग, जॉय थॉमस आणि इतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता. या गैरव्यवहारातील 95 कोटी एचडीआयएलच्या मार्फत प्रवीण राऊतने इतर ठिकाणी वळते केल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button