Chimur

नराभक्षक वाघास वनविभागाने जेरबंद करावे .. जीप सदस्य गजानन बुटके

नराभक्षक वाघास वनविभागाने
जेरबंद करावे .. जीप सदस्य गजानन बुटके

चिमूर ज्ञानेश्वर जुमनाके

ताडोबा व्याघ्र प्रकल्प च्या शेजारी असलेल्या गाव शेतशिवारात नरभक्षक वाघ धुमाकूळ घालत असून एक दोन महिन्यांत चार नागरिकांचा बळी घेतलेला असल्याने दहशत वातावरण पसरले असून वनविभागाने त्या नरभक्षक वाघास जेरबंद करण्याची मागणी कांग्रेस जिल्हा सरचिटणीस तथा जीप सदस्य गजानन बुटके यांनी केली आहे.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारी कोलारा सातारा बामनगाव किटाडी टेकेपार तळोधी बेलारा विहिरगाव गावे असून या परिसरात वाघाचा धुमाकूळ असून मागील एक दोन महिन्यांत बामनगाव सातारा कोलारा येथील चार नागरिकांचा बळी घेतलेला आहे वाघ आणि मानव यांच्यात संघर्ष सुरू झालेला असून सद्या शेती हंगाम सुरू झालेला आहे बहुतांश शेती ही जंगल शेजारी आहे शेतकरी शेतमजूर यांना शेती करणे कठीण चालले आहे कारण त्या नरभक्षक वाघाची दहशत आहे.

वनविभागाने त्या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करून जेरबंद करण्याची मागणी जिल्हा कांग्रेस जिल्हा सरचिटणीस तथा जीप सदस्य गजानन बुटके यांनी केली असून अन्यथा वनविभाग समोर आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button